Posts

Showing posts from 2019

शिवराज्याभिषेक-3

Image
रायगड जगतो आम्ही (भाग-3)                      @insta - https://www.instagram.com/p/CA1z-skJIMp/?igshid=14q4k7ins1ogh @youtube - https://www.youtube.com/channel/UCZkFHCtx-JL9pPQYrYO1ppA         एक thrill चा भाग मनजे, रायगडवर टेंटसाठी जागा आम्हाला गर्दीत नको होती, म्हणून शोधत शोधत झाडीत गेलतो. टकमक टोकाकडे जाणाऱ्या रस्त्यात नागच राव. खरतर किरण्या ओरडला सापाय म्हणून पण मला वाटल चेष्टा करायलाय म्हणून मी दुर्लक्ष केल नी ठेवला त्या दगडावर पाय, लगेच ठेंग टाकून पुठे गेलो म्हणून बर नायतर दवाखानाच! तीन साडेतीन फुटाच पिल्ल होत ते पण कोब्राच होता. मी ठेंग टाकली तवा माझ्या पायाच्या दिशेने फुटबर फना काठलेलं, तिघांनीपण पाहिल. सगळ्यांनी नवल तेव्हा केल जेव्हा, मलाही साप दिसल्यानंतर मी तो पाहण्यासाठी म्हणून तेच्या तोंडापर्यंत गेलो नी हे पण सांगितल की तो कोब्रा होता म्हणून. खरतर सापाकडे अंधश्रंद्धेने पाहनारे आम्ही नाहीच, खरतर NDRF च ट्रेनिंग आणि हि भटकण्याची सवय, या मुळे साप म्हंटल की जरा भारीच वाटत, पण विषय हा...

शिवराज्याभिषेक-2

Image
   रायगडी जगतो आम्ही (भाग - 2)              मग चढलो एकदाच गडावर, पण किरणच वजन नी सवय नसल्याकारणास्तव त्याला त्रास झाला नी वेळ पण, तरीही शेवटी आम्या, आन्याची पैज (फसलेली) पुर्ण करून गाठला रायगड. पण पैजे नुसार आन्या एकदापण बसला नाही. मी पहिल्यांदा रायगडला गेलतो त्यावेळी कुणासाठीच न थांबता, एका तासात वरती पोहचलेलो. पण त्यानंतर एकदाही जमल नाही, कारण प्रत्येकाला सोबत घेवून जायच आसत. तर किरण्या नी आम्याला शिव्या देत पोहचलो एकदाच. मग टेंटसाठी जागा हुडकत-हुडकत(शोधत) शेवटी समाधी जवळ आलो, तिथच एका इमारतीच्या (भग्न झालेल्या पुर्वीच्या इमारतींचे फौंडेशन्स आजून शाबूत आहेत) कोपऱ्यात टेंट लावला नी झोपलो. त्यात पहिल्यांदाच लावचा होता टेंट, मला तर नाहीच पण यांनाही कुणाला माहित न्हवतं. चढताना शेवाळेसोबत फोनवर बोलन झालत, त्यात त्याने टेंट कसा लावायचा ते पुसटस सांगितल होतं. मग आधी तो पुर्ण उघडला, मग चारी कोपरे बघितले, त्या काड्या बघितल्या नी थोडा-थोडा अंदाजा घेत शेवटी उभा केला टेंट. बाकीचे म्हंटले की मला माहित होत टेंट कसा लावायचा ते, मज्जाच. मग सगळ्यांच्या घ...

शिवराज्याभिषेक

Image
'रायगड जगतो आम्ही'(भाग - 1)        6 जून म्हंटल की आम्हा 'मावळ्यांची दिवाळीच', कुठून हा उत्साह येतो काय माहित. पण 6 जूनला रायगडावरती आसण्याची feeling काय औरच आसत्या. कार्यक्रम बघाय मिळो न मिळो पण शिवराज्याभिषेकादिवशी रायगडी राहण्याची दौलत कुणा ऐऱ्या गैऱ्याला नाय कळायची. रायगडावरती वर्षातून चार-पाच वेळा जाण होतच, पण सगळ्यात खास दिवस तो हाच. मागच्या वर्षापासूनच मी 6 जूनला गडावरती जाण्याला सुरूवात केली. यावर्षीतर 2 व्हिलरनेच गेलतो. मी, आन्या (अनिकेत कांबळे), आम्या (अमित यादव) नी किरण्या(किरण भोंगाळे). प्लँनिंग मोठच होत (कायम सारखच) पण एक एक करत सात- आठ जण शेवटी नायच म्हंटले, मग आमच कुठ आडतय, आम्या किरण्या एका गाडीव नी मी नी आऩ्या एका. खरतर वेळ माझ्याकडून कधीच पाळली गेली नाही. 2 व्हिलरन जायच तर लवकर निघल पाहिजे म्हणून आम्यान सांगितल, त्याप्रमाणे सकाळी दहा वाजता घरातून निघायच ठरल. पण दहा वाजता तर मी आवरायलाच घेतल होत, त्यात मला पोर्लेेला जावून शेवाळे (माझ्यासारखा सह्याद्रीची मुलुखगिरी करणारा एक मित्र) कडून टेंट घेवून यायच होत. या टेंटचीबी कथा हाय...