Posts

Showing posts from 2020

आसच...

Image
फिराय जायला कारण थोडीच लागत म्हणून आसच...                            काल अचानक बारा वाजता हुक्की आली. रोजच्या सेमिनार लेक्चर मुळ त्रस्त झालो होतो (जे आम्ही कधीतरच अटेंड करतो). आम्हा भटक्यांना या सह्यगिरीतला मोकळा श्वास हवा असतो. गेले काही दिवस गजापुरच्या खिंडीच्या शोधात पर्णाल इतिहास संशोधन मंडळ, पन्हाळा आम्ही शोध मोहीमा राबवत आहोत. यातील आणखी एका संभाव्य खिंडीचा अभ्यास करण्यासाठी व या काँलेजच्या धावपळीतून थोडी मुक्तता मिळावी म्हणून मी आणि शिवप्रसाद शेवाळेन एका छोट्याशा सफरीचं आयोजन केलं. वाघबीळातच आम्हाला आडवण्यात आलं. त्यांनी त्यांची प्रोसिजर पार पाडली. पण एका पोलिसासोबत बाचाबाची झाली, मनजे माझा अवतारपण तसा वेगळाच आसतो, मनजे टिशर्ट नी त्यावर बटणे काढलेला शर्ट किंवा जँकेट, गाँगल, नी आसा पेहराव आसनारा कोणी शोधमोहिमा करतोय पटणे कठीणच पण लोकांनीही त्यांची द्रुष्टी बदलली पाहिजे ना, राव शाळा, काँलेजेसचा टाँपर राहिलोय, सगळे मास्तर लोक नावाजतात, पण वागतो बिंदास मनजे व्यभिचारी नाहीना. आसो, निघता निघता त्यांनी 'विचारलं कुठं न...

मी, शनिवार नी भवानीगड

मी, शनिवार नी भवानी गड              शनिवार माझा आवडता दिवस. कारण, लहानपणापासून न आवडणार काम मनजे शाळेत जान. मग त्यात लवकर शाळा सुटणारा दिवस शनिवार, आम्ही लहान आसताना मी, माझे सगळे भाऊ बहिनी, भाऊ(पप्पा), मम्मी सगळे मिळून वडगावात स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जायचो, तिथल ते अध्यात्मिक वातावरण आणि परत येताना ऱूतू नुसार आईस्क्रिम किंवा भेल, पाणीपूरी यांची चव, त्यानंंतर रविवार त्यामुळ आभ्यास करावच आस काय नसायच आणि सकाळी निवांत उठणे, मनात आल तर आंघोळ वगैरे नायतर दुपारी खेळून झाल की पोहायला जायच वगैरे वगैरे.                पण आता मोठा झालो (आस बाकीचे म्हणतात). लहानपणीच ते रूटीन राहीलच नाय. आजचा शनिवार पण वेगळा होता. शुक्रवारी प्रजासत्ताक दिवस आसल्यामुळे घरी आलतो. माझा नवीन मित्र शेवाळे, शिवप्रसाद शेवाळे चांगला इतिहासकार होणार तो. मला पण किल्ले आणि फिरायच लय येड. मग आम्ही दोघांनीच प्लँन केला आणि शविवारी निघालो. भवानी गड,संगमेश्वर.    ...

वासोटा via नागेश्वर गुहा

Image
    वासोटा... एक दुर्गम नी अभ्यद्य कथा.              खरतर वासोटा, हुश्श इतिहास माहित आसेल तर वासोटा नाव ऐकताच मनात वेगळीच काहूर आणि अंगावर एक काटा उभा राहतो, तीन वर्षापुर्वी मी पहिल्यांदा वासोट्यावर गेलो तेव्हा मला वासोट्याची दुर्गमता कळलीच होती, त्यात हा प्रदेश, कोयना अभयारण्य, सह्याद्री राखीव वाघ्र प्रकल्प, आणि जर सातारामार्गे गेलातर एक उत्तम ट्रेक नी व्हेकेशन होऊ शकत, पण सर्व सोईनी युक्त. त्यात वेळपण कमी लागनार, पण मस्त वाटत ते बोटींग. तसच आता travelwithshivtej ची सुरूवात केल्यापासून ट्रेकतर होतच राहतात, पण नव्याने वासोट्याची आठवण येत होती. खरतर जायच होत नियमीत मार्गाने, शिवसागर जलाशयातून बोटींग करून वगैरे, पण वासोटा मँपवर पाहताना, अचानक चोरवणे मार्गे वासोट्याला जाता येत हे कळल, मनजे ते फोटो मी आमच्या सह्याद्रिची मुलुखगिरी या ग्रुपवर टाकले. मग आमचे मारूती सर (सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे वंशज मारूती गोळे) यांनी आम्हाला माहिती दिली, चोरवणे-नागेश्वर गुहा मार्गे वासोट्याला जाता येत. मग काय सुट्टी मिळ...