वासोटा via नागेश्वर गुहा
वासोटा... एक दुर्गम नी अभ्यद्य कथा. खरतर वासोटा, हुश्श इतिहास माहित आसेल तर वासोटा नाव ऐकताच मनात वेगळीच काहूर आणि अंगावर एक काटा उभा राहतो, तीन वर्षापुर्वी मी पहिल्यांदा वासोट्यावर गेलो तेव्हा मला वासोट्याची दुर्गमता कळलीच होती, त्यात हा प्रदेश, कोयना अभयारण्य, सह्याद्री राखीव वाघ्र प्रकल्प, आणि जर सातारामार्गे गेलातर एक उत्तम ट्रेक नी व्हेकेशन होऊ शकत, पण सर्व सोईनी युक्त. त्यात वेळपण कमी लागनार, पण मस्त वाटत ते बोटींग. तसच आता travelwithshivtej ची सुरूवात केल्यापासून ट्रेकतर होतच राहतात, पण नव्याने वासोट्याची आठवण येत होती. खरतर जायच होत नियमीत मार्गाने, शिवसागर जलाशयातून बोटींग करून वगैरे, पण वासोटा मँपवर पाहताना, अचानक चोरवणे मार्गे वासोट्याला जाता येत हे कळल, मनजे ते फोटो मी आमच्या सह्याद्रिची मुलुखगिरी या ग्रुपवर टाकले. मग आमचे मारूती सर (सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे वंशज मारूती गोळे) यांनी आम्हाला माहिती दिली, चोरवणे-नागेश्वर गुहा मार्गे वासोट्याला जाता येत. मग काय सुट्टी मिळ...