शिवराज्याभिषेक-2
रायगडी जगतो आम्ही (भाग - 2) मग चढलो एकदाच गडावर, पण किरणच वजन नी सवय नसल्याकारणास्तव त्याला त्रास झाला नी वेळ पण, तरीही शेवटी आम्या, आन्याची पैज (फसलेली) पुर्ण करून गाठला रायगड. पण पैजे नुसार आन्या एकदापण बसला नाही. मी पहिल्यांदा रायगडला गेलतो त्यावेळी कुणासाठीच न थांबता, एका तासात वरती पोहचलेलो. पण त्यानंतर एकदाही जमल नाही, कारण प्रत्येकाला सोबत घेवून जायच आसत. तर किरण्या नी आम्याला शिव्या देत पोहचलो एकदाच. मग टेंटसाठी जागा हुडकत-हुडकत(शोधत) शेवटी समाधी जवळ आलो, तिथच एका इमारतीच्या (भग्न झालेल्या पुर्वीच्या इमारतींचे फौंडेशन्स आजून शाबूत आहेत) कोपऱ्यात टेंट लावला नी झोपलो. त्यात पहिल्यांदाच लावचा होता टेंट, मला तर नाहीच पण यांनाही कुणाला माहित न्हवतं. चढताना शेवाळेसोबत फोनवर बोलन झालत, त्यात त्याने टेंट कसा लावायचा ते पुसटस सांगितल होतं. मग आधी तो पुर्ण उघडला, मग चारी कोपरे बघितले, त्या काड्या बघितल्या नी थोडा-थोडा अंदाजा घेत शेवटी उभा केला टेंट. बाकीचे म्हंटले की मला माहित होत टेंट कसा लावायचा ते, मज्जाच. मग सगळ्यांच्या घ...