वासोटा via नागेश्वर गुहा

    वासोटा... एक दुर्गम नी अभ्यद्य कथा.

             खरतर वासोटा, हुश्श इतिहास माहित आसेल तर वासोटा नाव ऐकताच मनात वेगळीच काहूर आणि अंगावर एक काटा उभा राहतो, तीन वर्षापुर्वी मी पहिल्यांदा वासोट्यावर गेलो तेव्हा मला वासोट्याची दुर्गमता कळलीच होती, त्यात हा प्रदेश, कोयना अभयारण्य, सह्याद्री राखीव वाघ्र प्रकल्प, आणि जर सातारामार्गे गेलातर एक उत्तम ट्रेक नी व्हेकेशन होऊ शकत, पण सर्व सोईनी युक्त. त्यात वेळपण कमी लागनार, पण मस्त वाटत ते बोटींग. तसच आता travelwithshivtej ची सुरूवात केल्यापासून ट्रेकतर होतच राहतात, पण नव्याने वासोट्याची आठवण येत होती. खरतर जायच होत नियमीत मार्गाने, शिवसागर जलाशयातून बोटींग करून वगैरे, पण वासोटा मँपवर पाहताना, अचानक चोरवणे मार्गे वासोट्याला जाता येत हे कळल, मनजे ते फोटो मी आमच्या सह्याद्रिची मुलुखगिरी या ग्रुपवर टाकले. मग आमचे मारूती सर (सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे वंशज मारूती गोळे) यांनी आम्हाला माहिती दिली, चोरवणे-नागेश्वर गुहा मार्गे वासोट्याला जाता येत. मग काय सुट्टी मिळताच वासोटा गाठायच आस आम्याच (अमित यादव) नी माझ ठरल. वासोटा म्हंटल्याव आपोआपच अंगावर शहारे येतात. यामार्गे पहिल्यांदाच वासोट्यावर जानार होतो.
                  आज 19 फेब्रुवारी, माझ्या राजाचा दिवस, शिवजयंती, काँलेजला सुट्टी मिळाली. मग वासोटा फिक्स. मारूती सरांनी सांगितल्याप्रमाने 8 वाजता निघून 4 ला गड फिरून खाली आम्ही उतरू, चोरवणेतून पाऊन तास नागेश्वर गुहा नी तिथून पाऊनतास वासोटा, मनजे चढाईला टोटल दिड तास, मारूती सरांनी आस सांगितल्याव वाटल, यांनी त्यांचा नाही तर आमचा विचार करून सांगितल आसेल, पण हे टायमिंग त्यांच झाल. पुढ काय काय झाल हे ऐकन महत्त्वाच.
                  तर आम्ही नियोजन केल 7 वाजता निघायच मग 2:30 तासात चोरवणे, तिथून 1:30-2 तास वासोटा मग निवांत गडावर हिंडून उतरायला काय तासभर, पण झाल सगळ, पाण्यात गेल नियोजन ( जे आम्हाला आजपर्यंत जमलच नाही ). तर झाल आस, सकाळी 6 ला उठलो, आवरल पण माझ व्हाँलेट मोठ्या गाडीत, पप्पा सकाळी लवकर आवरून त्यांच्या कार्यक्रमांना गेले, व्हाँलेटच्या नादात तास गेला आमचा, शेवटी पप्पांना वडगावात गाठून व्हाँलेट घेतल, त्यात लायसन होत त्यामुळ ते महत्त्वाच. मग 9 वाजता आम्ही चाललो किल्ले वासोटा.
                  आमचा प्रवास झाला सुरू, कराड-चिपळून-चोरवणे. आता प्रवासाच सांगायच तर रस्ता संपता संपत न्हवता. त्यात रस्त्याच काम आजआखेर सुरू आहे, त्यात वडगावमध्ये भादोलेला जाताना जो शेतकरी संघटनेचा कायतर पेट्रोल पंप आहे, जिथे आम्ही 210 रूपयच पेट्रोल टाकलेल (कारण संपलेलच तेल), ज्यात आम्ही 180 किंमी सहज जातो मनजे चोरवणेत. पण कुंभर्ली घाट पुर्ण गाडी बंद करून उतरवून पण चिपळूनपासून 6 किमी आदीच पेट्रोल संपल. मला तिथच शंका आली होती पण उशिर झाला म्हणून न बोलता चाललो. खरतर प्रवासात कोणी सोबत नसल तरी आपल कोणतर आसतच, तसच जाणाऱ्या गाड्यांमधील दोघा तिघांना विचारायच मनात येवून पण आम्ही एकनाथ मिस्त्री काका आल्यावरच त्यांना विचारल 'पेट्रोल पंप कुठाय?' तसे ते आम्हाला पाहतच येत होते. लगेच थांबले नी गाडीतल पेट्रोल काढून देतो बोल्ले. पण आम्ही म्हंटलो जवळ आसेल तर 'चाँक' लावून जातो, पण ते बोल्ले मी तुमच्या मागेच लावतो गाडी. मी चाँक लावला नी कशीतर 500-600 मीटर गाडी गेली नी बंद पडली. मग काका पुढे गेलते. ते पेट्रोलपंपावर जावून परत आले, कारण त्या पेट्रोल पंपावर तेल कधी आसत कधी नसत, नी त्यावेळीही तिथे तेल न्हवतं. मग काका मागे फिरले, आमच्या जवळ आले नी त्यांनी बाटली भरून पेट्रोल काढून दिल. त्यांच गाव पिंपळी खुर्द ते खेडला जात होते. मग काकांसोबत सेल्फी काढून आम्ही महाराजांचे आभार मानले नी काकांचेपण नी निघालो. खरच मानुसकी नी माणस आजून जिवंत आहेतच. मग चिपळूनला जावून पेट्रोल टाकल नी थेट चोरवणे गाढल, शेवटी 5 तासांनंतर मनजे दुपारच्या 2 वाजता कडक उन्हात आम्ही नागेश्वर मंदिराच्या पायथ्याशी पोहचलो. सकाळची काँफी त्याशिवाय पोटात काहीच नाही. तरीही आम्ही चढाईला सुरूवात केली. चोरवणेत जायच्या आधीच वासोटा दिसायला सुरूवात झालती नी नागेश्वर गुहापण, पण हे माहित न्हवत की नागेश्वर गुहा मनजे वासोट्यापासून लांब दिसनारा तो कडा आहे. मग जीपीएस वर दावत होत तो नागेश्वर कडा 2700 मीटर, मग वाटल जवळाय पण हे लक्षात आल नाही की तिथून वासोटा किती लांबाय. सुरूवातीला 1500-1600 मीटर पायऱ्या चढून गेल्या नंतर वाटल आता नागेश्वर गुहा आल्या वाटत, मग तिथून एक पावूनतासात वासोटा, कारण मारूतीसर बोल्लेले पावूनतासात नागेश्वर गुहा नी तिथून पावूनतासात वासोटा. पण दमलेलो खुप कारण मन कितीही तयारीत आसल तरी शरीर नी मेंदू किती केल्यास साथ देईना. कारण पोटात काहीच न्हवतं, सोबतच पाणीपण गरम झालत कारण चढाईला सुरूवातच दुपारची झालती त्यात खुप ऊन होत. त्यात बँगचच ओझ लय, आलटून पालटून ती बँग आम्ही वागवत होतो. वाटत होत आत्ता येईल आपली मंजील, पण... पण किती केल्या ते मंदिर नी ती गुहा काय दिसना. शेवटी पायऱ्या संपल्या नी पुढ बघतोय तर रस्ता दिसना, जवळची पायवाट दिसत होती पण नेमका अंदाज येईना की त्या वासोट्यावर कस जायच, एकिकड आम्ही चढतोय तो डोंगर दुसरीकडे वासोटा आणि यांना जोडनारी एक रांग, तिही आजून खुप वरती नी पुढ बघावतर एकदम खडा चढ. थोड चाललो नी वरती नाही म्हंटल तरी नजर जात होती. आर्धा तास चालल्यानंतर कड्यावरती काही लोक नी झेंडा नी त्रिशुल दिसल, एकदम होत्याच न्हवत झाल, कारण त्याकड्यावर जायला रस्ताच दिसना. पण आम्ही चालत राहिलो. तर आपल्या सह्याद्रीच वैशिष्ठ्य मनजे एका पर्वत रांगेला फुटलेले फाटे, मनजे एका खोडाला आसल्याल्या अनेक फांद्या. पिक पाँईंटला जावून बघितल्यावरच ते झाड आपल्याला दिसत. मग काय त्यात चढ काय आमची पाट सोडना. आम्ही चढतपण होतो नी चालत पण. नागेश्वर गुहाला जाण्याचा मार्ग नागमोडा म्हणून याच नाव नागेश्वर गुहा आस आम्या खाली यस्तवर म्हणत होत. जवळ जवळ चार ते पाच रांगांना आत बाहेर करत आम्ही शेवटी आश्या ठिकाणी पोचलो जिथे आम्हाला लोखंडीशिड्या दिसल्या. ज्या आमच्या पासून आजून 200-250 फुट वरती होत्या, तिथेपण जाने मनजे आडव तिडव जाव लागनार, सरळ नाहीच, पण त्याआधी आम्ही इतक दमलो की शेवटी जेवायला बसलो. दोघांच्यात फक्त एकच चपाती खाल्ली कारण शरीराला कितीही आवश्यकता आसली तरी आमच मन त्या वासोट्याकडे त्यामुळे जेवण जायनाच. आत्ता आम्ही टप्पे टप्पे पार करत जात होतो. थोडी वेळ बँग आम्याकड थोडी वेळ माझ्याकड. पण शेवटची रांग पुर्ण झाल्यावर आम्या म्हंटला तुझ तू जावून ये, दमलेलो तर मीही (शरीर) पण मी ते त्याला न दावता, शिव्या घालत उठवल नी थोड राहिलय आस म्हणत त्याला नेल.  आता पुढे होता सरळ कडा, ज्यात कुठे कातळात कोरलेल्या  पायऱ्या तर कुठे साखळ्या तर कुठे लोखंडी ग्रील्स. मग गमत रडत खडत शेवटी लोथंडी पायऱ्या नी पुढे वासोटा नी नागेश्वर दोन वेगवेगळ्या बाजूंना आसनारे बोर्ड दिसले एकदाचे. पण या चढाई दरम्यान आम्या कसा चढला तर स्वत:शी बोलत, सह्याद्रीला आपला बाप म्हणत नी स्वत:ला त्याचा मुलगा म्हणत ( जे की आम्ही आहोतच), हा आपल्याला दमवेल पण कायतर शिकवण्यासाठी, अमित तू करू शकतोस, आस म्हणत तो चढत होता. एका ठिकाणी कापरात थोड पाणी होत, ते त्यान थोड तोंडावर लावल नी नव्याने चालू लागला. आम्हाला काहीजन भेटले त्यांनी नागेश्वर कुंडाबद्दल सांगितल, आता आम्ही त्या पाण्याच्या हव्यासापोटी चढत पोहचलेलो नी सरळ तिकडेच गेलो. शर्ट काढून हात पाय धुतले नी पाणी मन भरून प्यालो. नी तिथेच जेवलो. तरी एक चपाती शिल्लक होती नी भाजीपण बाद होत आलती. पाणी भरून घेतल नी नागेश्वर गुहांवर गेलो, वेळ झालता पण आलोय तर बघून जावाव,गेलो नी तिथे न थांबता सरळ वासोट्याकडे, आजून आम्हाला ती पुर्ण रांग चालत जायची होती नी पुढे गेल्याव हे ही कळल की वासोट्याला तो एकमेव दरवाजा आहे, मनजे आम्हाला आजून त्या जंगलातून चालत जावून वासोटावरती जायचय हे कळता परत नको वाटत होत, पण वेळ न्हवता. कसलाच विचार न करता आम्ही चालत राहिलो. स्थानिकांना विचारल तर ते पाच वाजायच्या पुढे येथे थांबत नाहीत. नी आम्हाला विचारल 'तुम्ही आत्ता किल्ल्यावर जाताय???' तर त्यांच्याकडे फक्त बघून हासलो नी गेलो. आत्ता पावनेपाच वाजलेले, ते (स्थानिक) दहा मिनिटात खाली उतरनार होते, विचारल्यावर त्यांनीच सांगितल. खरतर ही वाटपण व्यवस्थित न्हवती, थोडा तोल गेला तरी उद्याच्या पेपरात नाव. आत्ता 5:30 झालते, जंगलाचा भाग सुरू झाला, गडाला 180 डिग्रीचा वेडा टाकून पुर्ण जंगल तुडवत आम्ही चालत होतो. आजवर वेगवेगळ्या जंगलांमध्ये चाललो पळलो, याच वासोट्यालापण येवून गेलतो, पण त्यावेळी सोबत आसलेला माँप (गर्दी) नी त्या झालेल्या रोजच्या वाटा यांमुळ इतके प्राणीही न्हवते नी दुर्गमताही न्हवती, पण वासोटा नी ही कोयना व्हाईल्ड सँच्युरी खरच दुर्गम आहे, पायवाट तर होती, पण सहसा कोणीच इकडने येत न्हवत. आत्ता पुर्ण या दोन पर्वतांवर आम्ही दोघच होतो (मानव प्राणी म्हणून). जंगलात शिरताच दंगा सुरू झाला माकड तर आसतातच पण वेगवेगळे प्राणी हिकड तिकड पळतायत, झाडावर, झुडपात खुप मनजे भयानक दंगा होत होता. सहसा प्राणी पळताना चाळचाळ मनजे वाळलेल्या पानांचा एकसारखा आवाज येतो पण इथे त्या चार पाय आसनाऱ्या प्राण्यांच्या पावलांचा आवाज कानावरती स्पष्ट पडत होता. पण आम्ही दुर्लक्षच करत चालत होतो. आजून गडाला निम्मा वेडा टाकूनपण 100-150 फुट चढायच होत. पण आम्याला जरा हाय जरा हाय म्हणत चढलो. शेवटी वासोटा आमचा अभद्य वासोटा आमच्या पुढे होता. खरतर 6:15 झालते. वरती आलतो पण खाली उतरायचय हेच मनात होत. 1:30 तासाचे 4:15 तास झालते. मला वाटत होत आम्हाला चकवा वगैरे लागला का काय?  कारण जेव्हा आम्ही पायऱ्या चढून पहिला टप्पा पार केला होता तेव्हा पासून लोखंडीशिड्या येईपातूर कित्येकवेळा वासोटा आम्हाला जवळ होता तर कधी लांब, जस एखाद लहान नी चपळ पोरग आपल्या हातातली आपली आवडती वस्तु घेवून पळून जात नी ते आपल्याला वेटवान दावत कधी जवळ कधी लांब जात तसच हा वासोटा आम्हाला खुनावत होता. वरती जाताच मारूती मंदिरापासून पुढे राजसदरकडे जाणाऱ्या मार्गावर परत दंगा, तिथने एक मुंगूसपण पळत गेला, त्यात आम्याला जवळ जवळ दोन फुट उंच नी काळी शेपूट व शेंडा तपकिरी आस कायतर दिसल, त्यात संध्याकाळ मनजे प्राणी शिकारीवर निघतात. मग त्याबाजूला न जाता आम्ही सरळ महादेव मंदिर गाढल नी पुढे बाबुकडा. मग तिथेच बसून सुर्यास्ताचा आनंद घेतला नी 6:40 ला तर परत जाण्यासाठी निघलो, मनजे येवढा खटाटोप करून फक्त 20 मिनट गडावरती थांबलो. इतका कमी वेळ तर मी आजपर्यंत कुठच घालवला नाही. किमान 2 तास तर मी अर्ध्या एकरचा भवानीगड बघायला घालवलेला. जाव वाटत न्हवत, पण उतरायच अंतर, सोबत नसनारी सामग्री, जेवण आसो वा आणखी काही, त्यात गडावरती आसनाऱ्या प्राण्याची खुसपुस, शेवटी पाय निघत नसताना उतरायला सुरूवात केली. आता अंधार पडत होता. जंगलात फक्त पायातल दिसत होत कसतर बाकी कायच दिसेना. पण बाकी कश्याचाच विचार न करता आम्ही चालत चालत पळत होतो. जंगलात आत शिरताना हातात घेतलेली ती जाड काठी मी पार लोखंडीशिड्यांवर गेल्यावरच खाली टाकली. विचार केला काही आडव आलच तर किमान वार करून धावता तरी येईल. जंगलातून बाहेर पडताच दोन मिनट बसून पाणी पिलो, मोबाईलच्या फ्लँश सुरू करून परत मार्गी लागलो. आता खुप सांभाळून जायच होत, कारण तोल गेला, चुकिच्या ठिकाणी पाय पडला की गेलो कामातन, पण आलो लोखंडी शिडीवर न थांबता उतरायला सुरूवात केली. मला थांबत थांबत किंवा हाळू उतरायलो तर पाय दमवतात. त्यामुळे उतरताना पळावच लागत पण आम्या मागे राहनार म्हणून मी त्याला पुढे घालून त्याच्या मागून चालत, उतरत होतो. पाय दमवत होते. भुका तर खुपच लागलेल्या. मी सहन करू शकतो तासन तास पण एकदा झाल की झाल, आम्ही काहीच विचार न करता, फक्त पुढे जावून काय खायच काय नाही हेच बोलत उतरत होतो, बेकरी बघून केक खाव्या, हाँटेलमघून निवांत जेवूया, गार कायतर पिवूया वगैरे वगैरे, पण शेवटी उतरलो, आता त्या पायऱ्या आल्या, आजून 1500-1600 मीटर जायच होत, उतरायच होत. पण थांबलो, नी राहिलेली एक चपाती मी पाण्यासोबत खाल्ली तोवर आम्या आडवा झाला. मग परत उतरायला सुरूवात झाली. त्या पायऱ्यापण संपता संपेनात, त्या संपायच्या 15 मिनिटे आधीपासून आमच सुरू होतं, संपतात का नाही संपतात का नाही.... शेवटी संपल्या गाडीजवळ पोहचलो, थोडासा वेळपण न घालवता, गाडी काढली नी सुसाट चिपळूनला जायला निघलो. कारण चांगल चांगल जेवण नी काही काही आमची वाट बघत होत. पण आम्या म्हंटला की तिथ चोरवण्यात पारायण सुराय तिथ जेवूया. मी गाडी नाही थांबवली कारण मला आता जेवणासाठी मला माझी चाँईस हवी होती. मला पायजे तेच खायच होत. पण उशिर झाला होता, तर मिळल तिथ खाव लागनार होत, मग चिपळूनच्या आधीच एका ठिकाणी खावून घेतल नी चिपळूनमदी येवून आयस्क्रिम खाल्ल नी तेलपण टाकल, पण यावेळी 205 चेच तेल टाकूनपण घरी पण गेलो. रात्रीचा प्रवास मला आवडतो, पण एखाद्या ठिकाणी मधेच थांबून सकाळी लवकर उठून घरी जायला पुढचा दिवस जातोच, त्यामुळे सहसा रात्री कितीही उशीर झाला तरी घरी जायचच मग 12 वाजो, 2 वाजो वा 4 घरी जायचच. पण यावेळी पप्पांनी दरडावलच. घरी यायच नाही कुठतर थांबा.
                  तर रात्रीचे 11 वाजले होते, चिपळून सोडून 15 किमी पुढे आलतो, आम्याच्या भय्याच्या घरी जायच तर चिपळूनपासून 15 किमी मागे जायच होत, मनजे 30 किमी, मग निर्णय घेतला मदी कुठ मंदिरवगैरे दिसलतर थांबायच नायतर सरळ कराड गाठायच तिथ वैभव मास्तरच्या रूमवर थांबायच. जस की खरच चकवा लागलेला, 2 तास झाले पण आम्ही 70 किमी पार करू शकलो न्हवतो. तरी गाडीपण पळवतच होतो, पण काय होत होत काय माहित नाही. आसो. 2 वाजलेले, कराडात पोहोचलो, निवांत झोपलो नी सकाळी 9 वाजता उठून घर गाठल. पण वासोटा, खरच दुर्गम नी अभद्य आसाच...
                  घरतर तो दमवनारा चाढाव, नको वाटत आसलेली वाट, ते वासोट्याच आम्हाला चकवा देण, आजपर्यंत इतका कधी न लागलेला वेळ, सोबतचा गडी माझ्या भरवस्याव पण मला आसलेली परिस्थितीची जाणीव आणि मागे न परतण्याचा निर्णय, कधीच वाटली न्हवती इतकी ती चिंता, भिती मनजे दोन शब्द नी दोन वेलांट्या या पेक्षा जास्त काहीच नाही, याची झालेली जाणीव, आमच्या कवी आन्याला (अनिकेत कांबळे) कोल्हापुर ते दिल्ली सायकल प्रवास करून मिळालेला त्याचा अनुभव नी त्यातून तो शिकलेले धडे, कदाचित तितकच, त्यापेक्षा कमी किंवा त्यापेक्षा जास्त मला या प्रवासात शिकवून गेले आसावेत, मी तरीही जास्त काही स्पष्ट करू शकत नाही, पण वासोटा ही इतिहासासाठी नी माझ्यासाठी एक दुर्गम नी अभ्यद्य कथा बनून गेलेत हे नक्की... तुमचाच शिवतेज माया प्रल्हाद तालुगडे, कदाचित नशीब म्हणून हा लेख लिहू शकलो, हे तेव्हा कळल जेव्हा पप्पा बोल्ले "एखाद्या वाघाने वाट आडवली आसती तर काय केल आसतसा ?" नी मी तरीही गप्पच...
                  तर आसा होता माझा वासोटा प्रवास.

खालील लिंकवर लवकरच वासोट्याचा व्हिडीओ शेअर करेण, पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करून नोटीफिकेशन आँन करा.... किंवा travel with shivtej youtube ला सर्च करा...

#TravelWITHshivtej

                     @insta - https://www.instagram.com/p/CA1z-skJIMp/?igshid=14q4k7ins1ogh

@youtube - https://www.youtube.com/channel/UCZkFHCtx-JL9pPQYrYO1ppA

रांगणा..... Travel with Shivtej..... Late night जंगल प्रवास on cycle

Please like, Share and Subscribe🤩✌🏻🚩❤

https://youtu.be/2uIdOCoVLqo


नागेश्वर गुहावरून पुढे वासोटा





महादेव मंदिर

हाची तो स्वर्ग, याचाच तो अट्टहास

Comments

Popular posts from this blog

आसच...

शिवराज्याभिषेक-2

शिवराज्याभिषेक