आसच...

फिराय जायला कारण थोडीच लागत म्हणून आसच...
            

              काल अचानक बारा वाजता हुक्की आली. रोजच्या सेमिनार लेक्चर मुळ त्रस्त झालो होतो (जे आम्ही कधीतरच अटेंड करतो). आम्हा भटक्यांना या सह्यगिरीतला मोकळा श्वास हवा असतो. गेले काही दिवस गजापुरच्या खिंडीच्या शोधात पर्णाल इतिहास संशोधन मंडळ, पन्हाळा आम्ही शोध मोहीमा राबवत आहोत. यातील आणखी एका संभाव्य खिंडीचा अभ्यास करण्यासाठी व या काँलेजच्या धावपळीतून थोडी मुक्तता मिळावी म्हणून मी आणि शिवप्रसाद शेवाळेन एका छोट्याशा सफरीचं आयोजन केलं. वाघबीळातच आम्हाला आडवण्यात आलं. त्यांनी त्यांची प्रोसिजर पार पाडली. पण एका पोलिसासोबत बाचाबाची झाली, मनजे माझा अवतारपण तसा वेगळाच आसतो, मनजे टिशर्ट नी त्यावर बटणे काढलेला शर्ट किंवा जँकेट, गाँगल, नी आसा पेहराव आसनारा कोणी शोधमोहिमा करतोय पटणे कठीणच पण लोकांनीही त्यांची द्रुष्टी बदलली पाहिजे ना, राव शाळा, काँलेजेसचा टाँपर राहिलोय, सगळे मास्तर लोक नावाजतात, पण वागतो बिंदास मनजे व्यभिचारी नाहीना. आसो, निघता निघता त्यांनी 'विचारलं कुठं निघालाय', मी बोल्लो 'विशाळगडला'. त्यांनी विचारलं 'का?' मी म्हंटलो "आसच".
                   मग मलकापूर मार्गे आम्ही विशाळगड, माचाळला  रवाना झालो. खोल दऱ्यांमध्ये घुमनारे झऱ्यांचे आवाज, डोंगर उतारावर दिसनारी गवताची लुसलुशीत कुरणं, दुरवर दिसनारे धबधबे, इकडून तिकडे रस्ता क्राँस करणाऱ्या खारूताई नी घोरपडी ( 'रणजीत देसाईंच्या शेकरा'मध्ये वर्णन केलेल्या शेकरू सारख्या खारूताई वाटायच्या ), भन्नाट वळन, पांढरं पाणी जवळ लावलेले ट्रेकींगचे फलक आणि त्याचे कधी रस्त्यावरून तर कधी जंगलातून बदलनारे मार्ग, सुंदर डोंगरांना बोडकंपण देणारं खानकाम (पैशाच्या हव्यासापोटी निसर्गाची केलेली कत्तल, ते करणारे करण्यास परवानगी देणारे बीपबीप हत्यारेच) तरीही (पाँझिटिव्हीटी) या साऱ्या मंत्रमुग्ध करणाऱ्या निसर्गाचा आनंद घेत आम्ही चाललो होतो. एव्हाना आम्ही भल्यामोठ्या बुरजांनी शौर्यस्मारक उभं केलेल्या खिंडीत येवून पोहचलो. पावसाच्या पाण्याच्या प्रपातामुळे घळई तयार झाल्या आहेत, त्याला खिंड. म्हणणे कितपत योग्य आहे? नाही म्हणाव तर अपुरे पुरावे, पण इतिहास आणि त्या घटना महत्त्वाच्या, नी त्यांच स्मरणही.
                   

आम्ही त्याला वळसा घालून विशाळगडला रवाना झालो. मी प्रथमच विशाळगडला आलो होतो. डागडुजीची कामं शर्तीन चालू आहेत. विशाळगडाबाबत ग्रह होते. पडलेल्या दरवाज्यामधून आम्ही चाललो होतो. आम्हाला येथे एक मुलाखत घ्यायची होती. परंतू ढग दाटून आले होते ( शेवाळेच्या प्रेमाच्या आठवनीही ). मलीक रेहमानच्या दर्ग्याला येणाऱ्या भाविकांची गर्दी दिसत होती. त्यातच बसचा कंडेक्टर 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटातील अशोक सराफची आठवण करून देत होता, "कुर्णेवाडी, मलकापूर फुकट" आश्या आरोळ्या कानावर पडत होत्या. जो माझा ग्रह होता त्याचं आता मतामध्ये रूपांतर होत होतं. ज्या गोष्टीसाठी विशाळगड बदनाम आहे ती गलीच्छ अस्वच्छता सगळीकडं दिसत होती. तश्यातून वाट काढत आम्ही मुढा दरवाजा पाहीला. हजारो युद्ध जिंकलेल्या सेनापती असलेल्या अविर्भावात, गढ चढताना दहादा बसलेल्यांनी आपली नावं दरवाज्यावर रेखाटली होती. ही किती खेदाची गोष्ट आहे. प्रातविधीच्या खुनांमधून वाट काढत काढत आम्ही नरसोबा मंदिर पाहून अहिल्याबाईंच सती स्मारक ही पाहीलं. हळू हळू गलीच्छ वातावरण मागं पडत होतं. आणि निसर्गाचं विलोभनीय द्रुष्य डोळ्यात भरत होतं.


विविध फुलांनी रंगलेले डोंगरमाथे, प्रतीध्वनी ऐकू येणाऱ्या खोलखोल दऱ्या, जिकडे नजर जाईल तिकडे हिरवेगार डोंगर, यासाठीच काय तो आटापिटा केला होता. बँगा फेकून कुरणांवर पहूडलो. समोर माचाळाचा डोंगर आणि दुरवर प्रभानवल्ली...... पश्चिमेकडील भुयार मार्ग पाहून माचाळचा डोंगर आणि विशाळगड यांच्यामध्ये आसनाऱ्या खिंडीमध्ये येवून थांबलो. गव्याच्या पावलांचे  ताजे ठसे दिसत होते. शेवाळे  कोठेतरी जंगलात नेत होता ( 'ये शोधन' या डाँ. दिपक चव्हान याच्या पुस्तकात शेवाळेनं वाचलेला माचाळ डोळ्यासमोर येत होता, तो हे बोलत होता). एक छोटीशी पावूल वाट काय ती सोबत, त्यातही गव्याच्या पावलांनी खचली होती. एका शिळेजवळ येवून तो थांबला. जवळच रचलेल्या शिळांचा घेर दिसत होता. हाच तो शेवटचा माचाळचा साक्षीदार. मग आम्ही दोघं झाडीमध्ये घुसलो. झाडीत कुठेतरी बांधकामाचे अवशेष दिसत होते. त्या सगळ्यांची पाहणी करून फोटो घेतले. तेथील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला. वळवाचे चार थेंब आंगावर पडले, म्हणून आम्ही परतीचा मार्ग धरला.
                    
विशाळगडावर वाघजाई मंदिर, घोड्याची टाप, आदी ठिकाणी पाहून गड उतरलो. आणि ज्यांची मुलाखत घ्यायची होती, त्यांना भेटलो नी मुलाखत ही घेतली. आम्हाला प्रस्तापित प्रवाहाला छेदनारी माहीती मिळाली. त्यांनी आम्हाला घोडखिंडही दावली. आमच्या अभ्यासाच्या प्रक्रियेत आणखी एका खिंडीची भर पडली. आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. पोटात कावळेही ओरडत होते, अनियोेजित सफरीवर निघाल्यामुळे व्यवस्था नी पैसेही अपुरे. घरीही सांगितलं न्हवतं. विशाळगडी आसतानाच घरातून फोन येवून गेलता. निघतोय बोल्लेलो. पण व्हायचा तो उशीर होणारच. आमचं कसं निवांत सगळं. निघलो. पांढऱ्या पाण्यापर्यंत सगळं ठिक होतं. पण आता अंधारही पडला नी पावसाचे थेंबही. मोठा आला तर थोडं थांबलो. मग जास्त उशीर नको म्हणून रिमझिमीतच निघालो. आशा सफरींवरती गेल्याने फक्त मन:शांती मिळत नाही किंवा इतिहासाचा अभ्यास होतो वगैरे, तर नव्या प्रदेशातून नवी उम्मीद व स्वत:ला ओळखण्याची एक संधीही मिळते.
                     सध्या मी सुरू केलेली travelwithshivtej ही थिम आशीच, ठिकाण फिक्स करा अगर न करा, बाहेर निघून लोकांना नवीन ठिकाण दावायला नी मलाही नव्याने पहायला चांगल वाटतय, लोकांनाही नवीन अनुभव मिळतायत, तरी तुम्हीही अनुभवू शकता, call 9049674431... किंवा ठिकाण ठरवा मी फिरवतो तुम्हाला...
                     @insta - https://www.instagram.com/p/CA1z-skJIMp/?igshid=14q4k7ins1ogh

@youtube - https://www.youtube.com/channel/UCZkFHCtx-JL9pPQYrYO1ppA

Comments

Popular posts from this blog

शिवराज्याभिषेक-2

शिवराज्याभिषेक