शिवराज्याभिषेक
'रायगड जगतो आम्ही'(भाग - 1)
6 जून म्हंटल की आम्हा 'मावळ्यांची दिवाळीच', कुठून हा उत्साह येतो काय माहित. पण 6 जूनला रायगडावरती आसण्याची feeling काय औरच आसत्या. कार्यक्रम बघाय मिळो न मिळो पण शिवराज्याभिषेकादिवशी रायगडी राहण्याची दौलत कुणा ऐऱ्या गैऱ्याला नाय कळायची. रायगडावरती वर्षातून चार-पाच वेळा जाण होतच, पण सगळ्यात खास दिवस तो हाच. मागच्या वर्षापासूनच मी 6 जूनला गडावरती जाण्याला सुरूवात केली. यावर्षीतर 2 व्हिलरनेच गेलतो. मी, आन्या (अनिकेत कांबळे), आम्या (अमित यादव) नी किरण्या(किरण भोंगाळे). प्लँनिंग मोठच होत (कायम सारखच) पण एक एक करत सात- आठ जण शेवटी नायच म्हंटले, मग आमच कुठ आडतय, आम्या किरण्या एका गाडीव नी मी नी आऩ्या एका. खरतर वेळ माझ्याकडून कधीच पाळली गेली नाही. 2 व्हिलरन जायच तर लवकर निघल पाहिजे म्हणून आम्यान सांगितल, त्याप्रमाणे सकाळी दहा वाजता घरातून निघायच ठरल. पण दहा वाजता तर मी आवरायलाच घेतल होत, त्यात मला पोर्लेेला जावून शेवाळे (माझ्यासारखा सह्याद्रीची मुलुखगिरी करणारा एक मित्र) कडून टेंट घेवून यायच होत. या टेंटचीबी कथा हाय, हा टेंट आमचे ऐव्हरेस्ट सर केलेले तेलंगे सरांचा आहे. नुकताच तो आम्ही आमच्या ताब्यात घेतलाय. तर, मी जवळपास 11 च्या सुमारास पोर्लेला जाण्यासाठी घरातून निघालो, तोवर आम्याचे फोन येवून गेलते, आम्या 9 वाजताच बाहेर पडणार होता, तरी त्याला उशीरा निघ म्हणून सांगून पण तो दहाला घरातून निघून 11 पर्यंत उंब्रजमध्ये येवून पोहचलेला नी फोन करून पिडत होत. आन्याला बावड्यात येण्यास सांगितल होत, त्यात तेच्या मोबाईलची बाँम्ब, फोनच लागत नाही तेला. बावड्यात पोहचून दहा-पंधरा मिनिटे वाट बघून मी पोर्लेला जायला निघालो, बावड्यातून वडणगे मार्गे मी पोर्लेला जाण्यासाठी बावड्याच्या पुलावरती गेलो तर तिथ काम सुकू आसल्या कारणाने पाच मिनिटे गेली, तेवढ्यात आन्याचा फोन आला मग परत बावड्यात जावून त्याला घेतला नी परत निघालो पोर्लेला. पोहोचलो एकदाच, मग लगेच शेवाळेकडून टेंट घेतला नी निघालो, मी पहिल्यांदाच टेंट वापरणार होतो, लावायचा कसा माहित नाही. त्याला फोनवरून कळव म्हंटल नी निघालो. मग घरी पोहचू. माझी बँग घेतली नी लगेच उंब्रजला जाण्यासाठी निघालो, आम्या फोण करून दमलेल, मी फोनवर लक्षच दिल नाही नी आन्यान पण मोबाईल स्विचआँफ केलता. स्पिड कमी-जास्त करत पोहचलो उंब्रजात. मग काय उशीर न लावता निघालो आमच्या रायगडला. थोड पुढ जावून गार गार कलिंगड खाल्ली, नी सरळ सातारा गाठला. कलिंगड खाताना आम्याचा काँड मी काढून घेतलेला, माझे चारी काँड एकदमच कुठतर गायब झालेत. आणि प्रवासात मला गाणी ऐकणे compulsary आसतय. मग काय आमचं आम्या म्हंटल काँड घ्यायचा. मी तर जास्त पैसे आणले न्हवते. मग काय आम्यान मला काँड घेवून दिला. मग 'कुठच न थांबता रायगडला जाणार' हे फक्त म्हणायच. तरी निघलो साताऱ्यातून रायगड मार्ग धरला. सकाळी फक्त थोडसच कायतर खाल्यामुळ भुका लागलेल्या. जेवण सोबतच घेतलेलं. दहा-दहा चपात्या नी दोन वेळची भाजी. मग केळघर या ठिकाणी थांबून जेवलो, तिथ एकच घर आहे नी त्यांनी रोडलाच चांगलच ज्युस सेंटर खोललय, तिथ बसून निवांत जेवलो, गप्पा गोष्टी करत. आणि मग काळ्या द्राक्षांचा ज्युस प्यालो, दुध घालून केलेला तो ज्युस एक नंबर होता, गारेगार...मग उठलो नी सरळ रायगड गाठायच ठरल. तोवरका विन्याचा ( विनायक सुर्यवंशी) फोन आला. त्याच्या चुकीमुळ त्याला एकट्याला एसटी ने याव लागत होत. तरीही तो आम्हाला महाबळेश्वरच्या घाटात गाठ पडला, लिफ्टने आला तो. मग महाबळेश्वरमध्ये एसटी पकडून तो महाडला आला. महाबळेश्वरमध्ये नुकताच पावूस पडून गेलता. वातावरणामुळे एकदमच फ्रेश झाल्यासारख वाटत होत. महाबळेश्वरच्या घाटात थांबून परत प्रवासाला सुरूवात. घाटात किरण्याचं स्पिड जरा कमीच होत( कमीच आसाव) पण तरीही तो लय माग रहायचा. मग त्यांची वाट बघत जरा जरा थांबत प्रवास सुरू होता. मग प्रतापगड आला. प्रतापगडला जायच नाही म्हंटलो कारण उशीर झालता. 5 वाजले होते बहुतेक किंवा थोड जास्तच. मी वेळच बघत नाही प्रवासात. मग आंबेनळी घाटात थांबून प्रतापगडचे फोटो काढले. या पाँईंटवरून प्रतापगड class दिसतो. मग ते डोळ्यात भरून निघालो परत. मी चहा खुपच कमी केलाय (तरीही सुरू असतो जरा जरा). मग एका चहाच्या टपरीवर थांबलो घाटातच नी चहा घेवून सरळ महाड गाठल. विन्याला फोन केला ते लांब हुत आजून. मग काय, अंधार पडलेला, त्यामुळे सरळ रायगड गाठला. मग जेवण होत थोड ते जेवलो झाडात बसून. हो झाडात बसून, रोपवे कडे जाणाऱ्या रोडलाच लहान गाड्या रस्त्याकडेला लावलेल्या. आम्ही गाड्या पाक झाडीत लावल्या. मग झाडीत बसूनच जेवलो. मग गडावर चढायला सुरूवात केली. पंधरा वीस पायऱ्या वर चढून विन्याची आठवण झाली. मग फोन करावातर लागना, लागलातर आवाज येईना, शेवची लागला तर विन्या आजून रायगड फाट्यावरच. मग आमच पुढ जायच ठरल. तरीही तलब, चहाची तलब, पायथ्याला परत येवून चहा घेतला नी मग परत सरळ रायगड गाठायच ठरल.
भाग दोन
https://shivadevil3.blogspot.com/2019/06/2.html
@insta - https://www.instagram.com/p/CA1z-skJIMp/?igshid=14q4k7ins1ogh
@youtube - https://www.youtube.com/channel/UCZkFHCtx-JL9pPQYrYO1ppA
पुढची मज्जा लवकरच...







Comments
Jay shivrai....