शिवराज्याभिषेक-2
रायगडी जगतो आम्ही (भाग - 2)
मग चढलो एकदाच गडावर, पण किरणच वजन नी सवय नसल्याकारणास्तव त्याला त्रास झाला नी वेळ पण, तरीही शेवटी आम्या, आन्याची पैज (फसलेली) पुर्ण करून गाठला रायगड. पण पैजे नुसार आन्या एकदापण बसला नाही. मी पहिल्यांदा रायगडला गेलतो त्यावेळी कुणासाठीच न थांबता, एका तासात वरती पोहचलेलो. पण त्यानंतर एकदाही जमल नाही, कारण प्रत्येकाला सोबत घेवून जायच आसत. तर किरण्या नी आम्याला शिव्या देत पोहचलो एकदाच. मग टेंटसाठी जागा हुडकत-हुडकत(शोधत) शेवटी समाधी जवळ आलो, तिथच एका इमारतीच्या (भग्न झालेल्या पुर्वीच्या इमारतींचे फौंडेशन्स आजून शाबूत आहेत) कोपऱ्यात टेंट लावला नी झोपलो. त्यात पहिल्यांदाच लावचा होता टेंट, मला तर नाहीच पण यांनाही कुणाला माहित न्हवतं. चढताना शेवाळेसोबत फोनवर बोलन झालत, त्यात त्याने टेंट कसा लावायचा ते पुसटस सांगितल होतं. मग आधी तो पुर्ण उघडला, मग चारी कोपरे बघितले, त्या काड्या बघितल्या नी थोडा-थोडा अंदाजा घेत शेवटी उभा केला टेंट. बाकीचे म्हंटले की मला माहित होत टेंट कसा लावायचा ते, मज्जाच. मग सगळ्यांच्या घामांचा वास येत होता, मग सेंट मारला सगळीकड टेंटमध्ये. थोडासाच कमी आला वास. कस तर गेलो झोपी.
सकाळी निवांत उठून, बेट्टी घेवून, प्रातविधी आवरून,मी नी आन्या वाघ दरवाज्याच्या समांतर असणाऱ्या टेकडीवरल्या (रायगडचाच भाग आसलेली) त्या इमारती पाहण्यासाठी म्हणून गेलो, उड्या मारत, पळत, घसरत पोहचलो, धुके खालून वरती येत होती, (मागच्या वर्षीचा टकमक टोक तर जणू आम्हाला स्वर्गातच घेवून गेलता) खुपच छान वाटल, खरच रायगडची विशालता याच कडेकपाऱ्यांवरून कळून येते, गाईड्स दावणारी ठिकाणी ही तर फक्त तुमची तहाण भागवतात, पण आमच्यासोबत फिरला तर तुमची भुकपण भागेल. समाधी जवळच्या तलावातील पाण्याने फ्रेश झालो, नी चांगली कपडे घालून, समाधी दर्शन घेवून, किल्ला फिरलो. किल्ल्यावरती कुठल्याही टेकाव जावा, तिथ पाण्याचे टाक सापडणारच, तेही सुस्थितीत. त्यात सँड्या (संदीप शिंदे), विन्या आम्हाला शोधत होते, रेंजच्या प्राँब्लेममुळे आमची गाठ पडलीच नाही. मग निवांत किल्ला फिरूण, दरबारात महाराजांनाचा आशीर्वाद घेवून, प्रसाद घेतला(जेवलो) मग निवांत किल्ल्याच्या दक्षिण बाजूच्या एका टेकडीवर येवून झोपाव आणि गर्दी कमा झाल्यावर उतराव हा विचार करून आलो, तर तिथून पोलिसांनी उठवलो, मग तिथून दुसरीकडे येवून, टेंट हातरला नी झोपलो, पण मला तर झोप लागत नाही आशी. मी निवांत गाणी ऐकत बाजूला येवून निसर्गाचा स्वाद घेत बसलो, ही उन्हातपण झोपलीत, मग मीही झोपाव म्हंटल, मग जावून टेंट लावला, पण झोप काय नाय लागली, तोवर आम्या गर्दी कमी झालेय, म्हणत आला. मग टेंट गुंडळला नी निघालो. मग महादरवाज्यापर्यंत जास्त गर्दीमुळ हळूहळूच याव लागल, पण परत पळत वाटा शोधत मी नी आम्या पळालो, आन्या नी किरण्या निवांत येत होती. उतरताना नाने दरवाज्यातून उतरलो. लगेच पाचाडचा वाडा गाठला, आणि माँसाहेबांच्या समाधीच दर्शनही घेतल. शिवाजी विद्यापिठातून रायगड स्वच्छतेसाठी NSS ची टिम आलती, त्यात आमचे मित्रही होते, त्यांनाही भेटलो. खरतर रायगडवर जाण्यासाठी आता पुर्ण पायऱ्या झाल्यात पण त्या दमवतात नी मज्जा पण कमी होते, आसो शोभा वाढलीय. खाली उतरलो, मागच्या वर्षीपेक्षा गोंधळ नी गर्दी कमीच होती. मागच्या वर्षी आम्ही 6 तारखेलाच सकाळी 7 वाजता चढायला सुरूवात केलती, पोहचलो रात्री 7 ला. पण तेही thrill वेगळच होत. उतरलो शेवटी मग जरा वडापाव खावून गाड्या घेतल्या नी थेट महाड गाठल. आजून फिरायच होतं, थोड विचारपुस करून हरिहरेश्वरला जायच ठरल, 8 वाजले होते. भुका लागत होत्या, चायनिज खायच ठरलेलं. खरतर रात्रीचा प्रवास का करू नये, हे याच सारख्या अनुभवातून कळत, पण काय करायच आम्हाला गाड्या मारायला रात्रच आवडते. मग थेट हरिहरेश्वर गाठायच ठरल. तर त्यात ही एक थ्रिल.....

भाग तीन - https://shivadevil3.blogspot.com/2019/07/3-thrill.html
@insta - https://www.instagram.com/p/CA1z-skJIMp/?igshid=14q4k7ins1ogh
@youtube - https://www.youtube.com/channel/UCZkFHCtx-JL9pPQYrYO1ppA
![]() |
| संवर्धित इमारतींचे अवशेष |
![]() |
| टेंट मधून.... |
![]() |
| नाने दरवाजा |
![]() |
| माँसाहेबांच्या वाड्यातून बा रायगड... |
![]() |
| मी स्वत: |
![]() |
| आमचा टेंट, रात्री 1 वाजता. |
![]() |
| पाचाडवरून सुर्योदय |
![]() |
| Add caption |
![]() |
| वरती चढताना. |

Comments