एक thrill चा भाग मनजे, रायगडवर टेंटसाठी जागा आम्हाला गर्दीत नको होती, म्हणून शोधत शोधत झाडीत गेलतो. टकमक टोकाकडे जाणाऱ्या रस्त्यात नागच राव. खरतर किरण्या ओरडला सापाय म्हणून पण मला वाटल चेष्टा करायलाय म्हणून मी दुर्लक्ष केल नी ठेवला त्या दगडावर पाय, लगेच ठेंग टाकून पुठे गेलो म्हणून बर नायतर दवाखानाच! तीन साडेतीन फुटाच पिल्ल होत ते पण कोब्राच होता. मी ठेंग टाकली तवा माझ्या पायाच्या दिशेने फुटबर फना काठलेलं, तिघांनीपण पाहिल. सगळ्यांनी नवल तेव्हा केल जेव्हा, मलाही साप दिसल्यानंतर मी तो पाहण्यासाठी म्हणून तेच्या तोंडापर्यंत गेलो नी हे पण सांगितल की तो कोब्रा होता म्हणून. खरतर सापाकडे अंधश्रंद्धेने पाहनारे आम्ही नाहीच, खरतर NDRF च ट्रेनिंग आणि हि भटकण्याची सवय, या मुळे साप म्हंटल की जरा भारीच वाटत, पण विषय हाच की त्यांच्यापासून लांब राहिल्यालच बर, आणि कोणता साप आहे हे माहित नसेल तर लयच लांब रहाव. आमच काय थोडाफार अभ्यास आसल्याकारणास्तव आम्ही सावधानता बाळगूणच त्यांच्या जवळ जातो. खरतर रायगडचा कार्यक्रम संपला(औपचारिकरित्या), पण आम्ही रायगडला निघालो तर रायगड सोडून दुसरा एखादा किल्ला किंवा दुसर एखाद ठिकाण पाहण्यासाठी जायचच आसत. मग रायगड उतरलो नी ठरल्याप्रमाणे हरिहरेश्वर गाठायच ठरल, मग खायच कुठ तर मधीच थांबून, म्हणून महाडात न थांबता चलो हरिहरेश्वर. किती वाजलेलं बघितलच नाही. तर सरस्वती नदीच्या मोठ्याले पात्राच्या काटानेच निम्मा प्रवास झाला. म्हसळ्यात थांबलो ,लयच भुका लागलेल्यात. खरतर बाकीचे म्हणत होते, महाडातच खायच पण मीच बोल्लो चला पुढ जावून खावू म्हणून. एक तर भुका लागल्याव माणूस चिडचिडा होतो, मग सगळ्यांचच हाल तसच झाल, कायच दिसत न्हवत, शेवटी म्हसळ्यात चायनिजचाच गाडा दिसला, न विचार करता गाड्या लावल्या नी थेट आँर्डरी दिला, सगळ्यांनीच व्हेज नुडल्स खाल्ली. खरा thrill तर आत्ता आहे. रात्र खुप झाली होती, आकरा वाजून गेले आसतील. तिथ दोन माणस आल्ली, त्यांनी विचारपुस केली, आम्ही सगळ सांगितल. ते travelling च्याच व्यवसायातले होते. आम्ही ज्या रूटने जात होतो तो रात्रीच्या प्रवासासाठी चारचाकी गाड्यांसाठी पण सोईचा न्हवता, मनजे तो रस्ता पुर्ण जंगलातून जात होता, तिथून हरिहरेश्वर 40 किलोमीटरच्या आसपास होतं. आणि हा पुर्ण रस्ता जंगलाचाच, जनावर, कोणत्याही प्रकारची मानव वस्ती नाही, आणि त्यामुळे काही अनर्थ घडलच तर मदतीला काय जंगली प्राणी येनारात होय. मग येवढे जण सांगतायत म्हंटल्यावर आम्ही सावध झालो (तसा रस्ता चांगलाय, आस ही बोल्ले ते). मग थोडस माग जावून उजवीकडे वळून आलो तेच डावीकडे वळालो. पण एकतर हा कोकणी भाग, गाव म्हंटल तरी, एकाच ठिकाणी गर्दी नाहीतर पाच-दहा घरांची वाडी. आम्यान मँप लावलेला. कदाचित खरच काहीतरी वाईट होणार आसेल म्हणूनच आम्ही मागे फिरलेलो आसो.(जो होता हे चांगल्या साठीच होता है) मग काय सगळेच गांगारलेलो, पण मस्तीपण लय.....
खरतर पुर्ण ट्रिपचा thrill या येवढ्याच रस्त्यात बाहेर पडला. ती काय नी ही काय दोन्ही वाटा जंगलातूनच जातात. त्यात आम्यान मँप लावलेला, त्या shortcut मधी पण shortcut निघत होते. भुत-खेत मी बोलनारच नाही...पण माझी एक इच्छा आहे, भुताला भेटाव,(आसेलतर) त्याला विचाराव 'काय रे तुझा काय प्राँब्लेम, तु मेला, तुला मारल, त्यांची वाट लावना, आम्हाला कशाला भिती नी त्रास', आणि हेच सगळ बोलन आन्याच नी माझ सुरू होतं, त्यात आम्याचा मँप, एक कच्चा रस्ता होता तो पुढे आमच्याच रूटवर जाणारा रोड, घातली गाडी तिकड, टर्न घेतोय न घेतोय तवरका, एक ते खडी वाहनारा डंपर, चिरडतच होता आम्हाला. एकतर थोडी चढाई, त्यात गाडीवरती डब्बल, बारीक खडी रस्त्यावर. तो ट्रक येतोय म्हणून कोपऱ्याव थांबलो, पण हा पुर्ण घासून गेला आम्हाला, एक क्षणात मला वाटल, आता गेली माझी गाडी, त्यात त्या सिच्युएशनला गाडीपण आवरणा, हादरलोच आम्ही. मला तर वाटल, खरच कायतर घडतय आता, आपल्यासोबत. मी म्हंटलोही तस. आम्या म्हंटला आहे बरोबर रस्ता. भुतांना तर भेटायचच आहे ना. (हाहाहा...) मग तोच तो भुताच्या विषयावर चर्चा करत आम्ही रस्ता कापू लागलो, जाईल तस भकास नी भ्याड वाटत होत. तो डंपर सोडल्यास एकही वाहण किंवा माणूस दिसला नाही तिथ. कच्चा रस्ता आणि दोन्हीकडे गच्च झाडी, साधी एखादी पावूल वाट पण दिसत न्हवती त्या झाडांतून. त्यामुळ तर विषय लयच बहरला. भुत कशी आसतील, ती नसतातच, आसलीत तर का म्हणून नको तेंच्या माग लागत आसतील, भुत आहेस, येवढी शक्ती आहे तर कुनी मारल आसल तर तेला जावून का मारत नाहीत? का आमच्यागत मस्ती आसत्या त्यासनी, हे नी ते. आमची imagination लय बेक्कार. समजा एखाद भुत दिसलच, मग ते आपल्या माग लागल किंवा ओरडत, पळत आपल्याकड येईल, मग मी कितीही भ्यालो आसलो, माझा जिव जात आसलातरी त्या भुताला ओरडेन! 'ये गप, गप' नी म्हणेन ' हे बघ भ्यालोय आम्ही, खुप खुप, भ्यालोय, पण एकदा थांब नी काय बाबा तुमचा विषय, का उगा माझ्या माग लागलायस', नी तेला शात करून त्याचे प्रश्न सोडवन्याचा प्रयत्न करेण.... किती बालीश आहे ना हे, आसो माणसान कायम लहानच रहाव. (मनान) त्यामुळ जगताही येत नी भितीची जागा आपली curiocity घेते. आसो माझाही भुतावर विश्वास नाही, कारण आजपर्यंत इतक्या वाईट वाईट जागांवर गेलोय, की किमान एखादा इतिहासातला राजामहाराजातर झपाटायलाच हवा होता, रात्री अपरात्री जंगलांमध्ये नको त्या रस्त्यांवर, नको नको तिथे फिरलोय, पण कुठ तरी काहीतर आहे आसही कधी वाटल नाही.
तर आमचा thrill काय संपला न्हवता, हा कच्चा रस्ता संपत आला तस एक घर दिसल, नी रस्ता जावून मुख्य रस्त्याला मिळाला. हित जरा वाहण, दिसत होती. जरा माणसात आल्यावाणी वाटल. त्यात पण काहीतर होतच आमच्यासाठी. थोडस पुढ गेलो तर एक पक्षी, तो सर्व भुताटकीच्या गोष्टींमध्ये आसतो, पारव्यासारखा दिसतो तो. खुप जनांकडून आश्या कथा ऐकल्या होत्या, सस्सा किंवा पारवा किंवा हा पक्षी रात्री गाड्यांपुढ येतात, हालतच नाहीत नी त्यांना पास करून आपण पुढ आलो नी जर का त्यांच्याकडे मागे वळून पाहिल तर ते मोठे होतात किंवा गायब होतात. मग काय आम्या तेन पास झालीत नी आम्हीही पास झालो पण तो पक्षी काय उठला न्हवता. मग एक 50 मी. पुढ येवून मुद्दामून मागे बघितल, आंधारामुळ पक्षी काय दिसना, मग गाडी वळवली नी मागे गेलो, पण आजून दिसना पक्षी, मग लाईट पडल्याव दिसला जागचा हल्ला पण न्हवता, मग तेला डिवचल, सरकू लागला जरा जरा, मग लईच डिवचल तर गेला उडून. मग तर खात्रीच पटली, भुत my foot. त्यात नवलच आम्यान न किरण्या पुढ निघून गेले, आम्ही त्या पक्षाला डिवचत बसलोय, ही दोघ भ्यालीत, आम्हाला शोधायला ही पण माग फिरलीत. आसो आमच लक्ष होत म्हणून नायतर तो पक्षी मेलाच आसता की, रस्त्यावरून बाजूलातर गेला. मग परत सुसाट श्रीवर्धन गाठल, 12 वाजून गेलते, मग तिथ बीचवरच्या हेलीपँड शेजारीच, श्रीवर्धन बीचला मोठा कठडा केलाय, चांगला प्रशस्त, तिथ सकाळी morning walkला लोक येतात, तिथ आसनाऱ्या दोघांना विचारून झोपलो, ते बोल्ले पोलीस येतात, म्हणून पाक शेवटला टेंट लावाला नी 1-1:30 च्या आसपास गेलो झोपी. कारण हरिहरेश्वर आजून
15-20 किलोमीटर होता, त्यात श्रीवर्धन पण बघून होत, म्हणून झोपलो इथच.....
आश्या तऱ्हेने thrill तर संपला, पण झोपताना ही पोलिस आलेच तर कसला thrill होईल हा विचार करून झोपलो, सकाळी लवकर उठायच होत, कारण माणस चालायला येतात.
सकाळी उटलो, 7-8 वाजले, प्रातविधी आवरून, जरा बीचवर खेळलो, फोटो वगैरे नी लगेच निघालो तिथून, ते सरळ हरिहरेश्वर गाठला, हा रस्ता एक नंबर आहे. मस्त वाटल, फ्रेश झालो आल हरिहरेश्वर मग, तिथ तोंड धूवून काँफी घेतली. लयच ताज वाटल. मह सरळ बीच गाठला खेळलो, बागडलो, वाळूत पाण्यात खुप मज्जा केली. त्यात पाणी वाढत होत. ते वायु वादळ, त्यात मुळ होत होतं हे, कित्येत बीचवर बंदीच केलती, पण हे होत खुलं. त्यात बँगा भिजल्या, आम्ही टेंट हातरून त्यावर बँगा ठेवलेल्या, त्यामुळ जास्त भिजल्या नाहित. आमच एकदम लक्ष गेल तर, सगळ हिकडच तिकड झालत. चपला एकिकडे, बँगा एकीकडे, काढलेली कपडे एकिकडे, आम्याचे साँक्सच, आणि त्याच्या मस्तीने त्याचा एक ड्रेस वाहून गेला, म्हणतय 'मी समर्पित केला'...मग बँगा वगैरे उचलून परत थोड्या मागे नेवून ठेवल्या. शेवटी तिथही पाणी आल नी बँगा भिजल्याच. मग बास केल, कारण किरण्याला 5 वाजेपर्यंत पोहचायच होत. म्हणून मग आवरायला घेतल. मग हरिहरेश्वराच दर्शन घेतल. हरिहरेश्वर दक्षिण काशी, उत्तर काशी प्रमाणेच इथेही आधी कालभैरवाच दर्शन घेवून, नंतर हरिहरेश्वर मंदिरातील गणपतीचे, गरूडाचे, नंदीचे दर्शन घेवून मगच हरिहरेश्वराच दर्शन घेता येत. प्रदक्षिणा गोमसुत्री आहे. ब्रम्हा, विष्णू, महेशा आणि आदिमाया पार्वती येथे लिंग रूपाने प्रकट झाले. मुनी अगस्ती यांच्या तपश्चर्येने हरिहरेश्वर येथे प्रकट होवून वसले आहेत. मंदिराबाहेरून डोंगरावर ज्या पायऱ्या गेल्यात त्या तीर्थक्षेत्रांकडे जातात. हरिहरेश्वर डोंगररूपाने तिथे वसले आहेत आसे मानले जाते. विष्णू, गौरी, शुक्ल, पांडव, चक्र, सुर्यतीर्थ इ. तीर्थ आहेत. मग ते तार्थांकडे जाणारा मार्ग बंद केलता, त्यामुळ वरती जावून ती बघता नायत आलीत. मग मंदिरातून दर्शन घेवून, नाष्टा केला. नी निघलो. पाटन मार्गे जाण्याच ठरल. खरतर मागच्या वर्षी आम्ही पाटनजवळच्या रिव्हर्स फाँलला गेलतो, त्यावेळी पासून रस्ता उकरून ठेवलाय तो आजून तसाच त्यामुळे घरी यायला, 12:30 झाले. येतानाही खुप मस्त प्रवास झाला. करवांद खात. कुंबळे येथे थांबुन जेवलो. त्या हाँटेलचे मालक आपल्या कोल्हापुरचे, जवळच काँलेज सुरू झाल्यानंतर त्यांना मेसची मोठी आँर्डर आलेली, तर ते इथेच स्थायिक झाले. त्या मावशींची ओळख झाली. त्यांनी फक्त बोलन्यावरून ओळखल. मग जेवलो नी निघालो. खरतर खुप शिस्तात चालला होता प्रवास, मला जेवून झाल्यावरच समजल की याच गतीन गेलो तर रात्रीच पोचनार. मग चिपळून मध्ये आलो शेवटी, इथेच पाच वाजले. मग काय किरण्यान सांगितल फोन करून उशीर होणार म्हणून, हेच सकाळी केल आसत तर किमान आजून एखाद-दुसर ठिकाण बघून आलो आसतो. आसो तरीही चहा प्यायला थांबलेलो, तिथेच परशुरामाच्या मंदिराचा बोर्ड हुता, जायच म्हंटल बघायला. तर आन्या म्हणतय मी झोपतो इथच..... मग तेला नेला उचलून, प्रवासाची सवय नसल तर हुत आस. शेवटी तेही बघितल, जरा चर्चा झाली, नी येतान चर्चेसाठी एक विषय मिळाला. शेवटी अथक परिश्रम करून पाटन गाठल. खरतर माझी गाडी थोडी फास्टच आसते, हा पण मला मँनेज होते म्हणून. पण किरणला ही बहुतेक सवय नसल्यामुळे, तो निवांतच सारख त्याला मागे बघाव लागायच. मग पाटन मधून आम्ही कराडला नी ते उंब्रजला गेले. गाडी तीसऱ्या गेर वर एकदा नी कवातर चौथ्या गेरवर, रस्ता दिड वर्षे झाली तसाच पडलाय, कवा सुधारणार आमच सरकार कुनास ठावूक. तर शेवटी घरात पोहचलो. फोन बंद पडल्यामुळे घरी काव पण खावा लागला, पण तो एका शब्दाचाच, शेवटी आई म्हंटल्याव चिंता आलीच. मग गेलो झोपी.
झाल एकदाच, आता पुढच्या वर्षी परत रायगडला जायला तयार आम्ही, कारण 'रायगड जगतो आम्ही'.....
 |
| हरिहरेश्वरचा बीच |
 |
| हरिहरेश्वरच्या डोंगरावरून |
 |
| हरिहरेश्वरचे तीर्थक्षेत्र |
 |
| परशुरामाचे मंदिर |
 |
| श्रीवर्धनचा बीच |
 |
| श्रीवर्धन वरून सुर्योद्य |
 |
| परशुरामाच मंदिर |
 |
| हरिहरेश्वर तीर्थाकडे जाणारा मार्ग |
Comments