मी, शनिवार नी भवानीगड
मी, शनिवार नी भवानी गड
शनिवार माझा आवडता दिवस. कारण, लहानपणापासून न आवडणार काम मनजे शाळेत जान. मग त्यात लवकर शाळा सुटणारा दिवस शनिवार, आम्ही लहान आसताना मी, माझे सगळे भाऊ बहिनी, भाऊ(पप्पा), मम्मी सगळे मिळून वडगावात स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जायचो, तिथल ते अध्यात्मिक वातावरण आणि परत येताना ऱूतू नुसार आईस्क्रिम किंवा भेल, पाणीपूरी यांची चव, त्यानंंतर रविवार त्यामुळ आभ्यास करावच आस काय नसायच आणि सकाळी निवांत उठणे, मनात आल तर आंघोळ वगैरे नायतर दुपारी खेळून झाल की पोहायला जायच वगैरे वगैरे.
पण आता मोठा झालो (आस बाकीचे म्हणतात). लहानपणीच ते रूटीन राहीलच नाय. आजचा शनिवार पण वेगळा होता. शुक्रवारी प्रजासत्ताक दिवस आसल्यामुळे घरी आलतो. माझा नवीन मित्र शेवाळे, शिवप्रसाद शेवाळे चांगला इतिहासकार होणार तो. मला पण किल्ले आणि फिरायच लय येड. मग आम्ही दोघांनीच प्लँन केला आणि शविवारी निघालो. भवानी गड,संगमेश्वर.
सकाळी लवकर उठलो. आवरल. निघालो. शेवाळे बांबरवाडीचा मग तेला आंबवडेत यायला लावल. तिथून त्याला उचल्ला. नी आम्ही निघालो. खुप थंड होती. पण त्याची पर्वा न करता सुसाट. जाताना बांबवडेच्या पुठ गेल्यावर थांबून काँफीनाष्टा केला आणि परत आपल्या वाटला लागलो. शेवाळेला ज्या व्यक्तिमुळ ह्या गोष्टींच याड लागल ते सतीश वाकसे सर, त्याचे इयत्ता 3रीचे शिक्षक. त्यांनी पहील्यांदा त्याला व बाकीच्यांना पन्हाळा नी पावनगड दावला होता. आणखी बरेच उपक्रम त्यांनी केले होते त्यातूनच त्यालाही याच याड लागल. ते आता संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी गावातल्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. आम्ही विचारत विचारत तिथ पोहचलो. सरांनी 3 मुलांना बाहेरच थांबवलेल. त्यांनी आम्हाला बरोबर ओळखल. मी माझा कायमचा आवतार करून गेलतो, शेवाळेन पण साधाच ड्रेस घातलेला, त्याला सरांपुढ तस जायला संकोच वाटालता. मी बोल्लो चल आसूदे त्यात काय. मी तर राव चड्डी घालून फिरायचो. बर झाल आज घातली न्हवती, पण थंड नसती तर घातली आसती मी 'चड्डी'. आणि हे येवढी चांगली कपडे घालून पण वाकसे सरांना भेटलो मस्त वाटल. सर मन मिळावू आहेत. त्यांनी प्रजासत्ताक दिनी चांगला कार्यक्रम ठेवला होता. शाळेच्या ग्राऊंडवर चांगला मांडव होता. त्यांनी शाळेसाठी नी विद्यार्थांसाठी स्वत:ला वाहून घेतल्याच दिसत होत. त्यांनी ज्यावेळी शाळेचा पट सांगितला तेव्हा मला सरांचा एकदमच अभिमान वाटला. पट फक्त 11 विद्यार्थी. मला ऐकून माहीत होत की कोकणातल्या शाळांमध्ये विद्यार्थी कमी आसतात पण त्या शाळेकड पाहीलना की वाटतच न्हवत ती 11 जनांसाठीचाय. कारण छोटी पण मस्त रंगवलेली माहीतीवाले चित्र काढलेले पूर्ण शाळेत नी शाळेबाहेर. छोटस ग्रीनहाऊस, हँगींग गार्डन, वेगवेगळ्या भाज्या नी रोपांची लागवड केलती. आणि सगळ्यात महत्वाच मनजे त्यांनी प्रतापगडाची एक चांगली मोठी प्रतीक्रुती बनवलेली. तेही कोणत्याही फोटो आणि मँप शिवाय आणि त्यावर महाराजांची एक मुर्ती, मस्त होत ते. आम्हीही महाराजांना फुल वाहीली आणि मनातल्या मनात सरांचे आभार मानले. खरच आज आशाच शिक्षकांची कमतरता भासतेय. बिना दुधाचा चहा, तिथ स्वयंपाक बनवनाऱ्या त्या सरदेशमुख आज्जीनी बनवलेला पण मस्त होता. मग तिथून त्या मुलांचा, गावकऱ्यांचा ना सरांचा निरोप घेतला नी थेट भवानी गडावर जायला निघालो.
मला प्रवासात गाणी ऐकण्याची, म्हणण्याची जी आवडाय तशीच आवड शेवाळेलापण आहे. माझ्या सोबत प्रवास करणाऱ्या माझ्या मित्रांना माझी ही सवय लागले. मग काय मी नी शेवाळे मजेत गाणी म्हणत रस्ता कापू लागलो. आम्ही ज्या भागातून जात होतो तो पूर्ण भाग बिबट्या सद्रूष्य होता. घनदाट झाडी होती. थोडा वेळ गाणी बंद केली नी निसर्गाच गाण ऐकायलो. वेगवेगळ्या पक्षांचा तो किलबिलाट, झाडांची सनसनाट ती निरव शांतता मनात घर करून गेली. जाताना राजवडी नावाच गाव लागत तिथ एक गरम पाण्याचा उगमाय. मला आचानक आढवल मी पहील्यांदा रायगजला जाताना तिथ थांबलेलो. शेवाळे बोल्ला येताना पाहू.
पावणेबाराच्या सुमारास आम्ही गडाखाली पोहोचलो. येताना विचारत याव लागल. एका गावात आल्यानंतर गडाच्या पायथ्याच्या गावाच नाव वितारल तर तो व्यक्ती म्हणाला 'गडावर जायचय का?' नवलच वाटल. गडाची उंची समुद्रसपाटीपासून 800 मीटराय. पण चढाव लागत जेमतेम 100 मीटर. तेही पक्या पायऱ्या बनवल्यात. कष्टाच काय कामच नाय. गाडीपण जवळ-जवळ गडापर्यंत जाते. नवीनच रस्ता बनवलेला. शिस्तात जाव लागल. कारण गाडीच पुठचा टायर पूर्णच घोटा होता. त्यात जास्त रहदारी नसल्या कारणाने रस्त्यावर खुप खडी होती. त्यात दोन-तीन मोठाले चढ. गाडी पहील्याच गेयरवर घ्यावी लागली. 4 व्हिलर वाल्यांना तर खुपच परिश्रमाच कामाय ते. आम्ही गेलो. जिथून पायऱ्या सुरू होतात तिथूनच एक कच्चा रस्ता होता. लहानसा. कळेना नेमक हितून पुढ जाव का पायऱ्यांवरून वर जावाव. मग तिथूनच त्या पायथ्याला आसल्याल्या त्या वस्तीतल्या एका माणसाला विचारल तर तो बोल्ला. 'पायऱ्यांनीच मंदिरात जात. तो रस्ता कुठच जात नाय.' पण आम्हाला तर गडावर जायचय आस विचारल्यावर तो बोल्ला. 'जा येथूच, जाताय गडावर.' मग काय झाली आमच्या ट्रेकिंगला सुरूवात. जोमतेम 15 मिनिटांत आम्ही गडावर आलो. प्रवेशद्वार अगदी लहान. किल्लाही अगदीच लहान होता. जेमतेम 2 एकरात आसेल. बहुतेक तो टेहळनीचाच किल्ला आसेल, कारण गडावरून खुप विस्त्रूत आणि आठी दिशांवर नजर ठेवता येत होती. खुप लांबपर्यतच्या पल्यावर नजर जात होती. गडाची पूर्ण पडझड झालेलीय. फक्त पाया तेवढा शिल्लकाय. 4 दिशांना चार बूरूज. पुर्वेकडून पहीला दरवाजा नी दक्षिनीकडून दुसरा. दक्षिनद्वारला बहूतेक चौकी होती. पश्चिमेकडील बाजूस दोन मोठ्या खोल्या आसल्याचे अवशेष दिसालते. गडावर कोणीच नसत. भवानी देवीच एक मंदीराय तिथच ....................साधूच्या समाध्या आहेत बहुतेक. एक लहान तोफ होती मंदिरात. आम्ही थोडे फोटो घेतले. व्हिडीओ बनवले आणि मंदिरातल्या ताटातला नारळ फोडून खाल्ला. आणि निघालो तिथून. परत येताना त्या राजवडीतला ते गरम पाण्याचा स्त्रोत पाहीला. तिथही एक प्राचीन शिव मंदीर होत. पूर्ण पडझड झाली होती त्याची. पण तिथच. वेगवेगळ्या शीला होत्या. सतीशीला, महादेव, विष्णू यांची प्रतिमा आसलेल्या शीला. तिथून निघालो ते थेट संगमेश्वर गाठल.
संगमेश्वरात पोहचल्या पोहचल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच दर्शन झाल. एकदमच फुल्ल्यावानी वाटल. मग वाकसे सरांनी सांगितल्यानुसार आणि आम्ही ठरवून आल्यान्वे, तिथ एका टपरीवाल्याकड कर्णेश्वर मंदिर, कार्तिक स्वामींच मंदिर, महाराजांना जिथ अडकवल गेल तो वाडा, शास्त्री आणि सोनवी या दोन नद्यांचा संगम आणि शेवाळेचे काही मित्र दोनच दिवसापूर्वी संगमेश्वरमध्ये प्राचीन मंदिर पाहून गेलते ती मंदिर. त्या टपरीबाहेर विचारपूस करावी म्हणून गाडी थांबली आणि अचानक काय झाल!!!!! काही खास नाही त्या टपरीबाहेर आडकवलेल्या फुकण्या नी बंबईमिठाईची पाकीट आमच्या गाडीपुढ येवून पडली. खुप दिवसानंतर बंबईमिठाई खाल्ली. लगेच च
त्याच्याकडन दोन पाकीट विकत घेतली. दोन मिनिटात ती सपलीपण. गाडीवरून जाताजाताच खाल्ली. पहील्यांदा कार्तिक स्वामींच मंदिर पाहायच ठरवल. महाराजांच्या स्मारकापासून दोन रस्ते जातात. त्यातला उजव्या हाताचा कार्तिक स्वामींच्या मंदिराकडे. आम्ही थोडत पुठ गेलो. चुकल्यावानी वाटल म्हणून तिथ एकाला आजोबांना विचारल. तर ते बोल्ले माग तो रस्ता वळलाय तिथूनच आत जायचय. पण कस कळणार तो तर साधा नी एखाद्या गल्लीत गेल्यासारखा रस्ता होता. आणि ते आजोबा बोल्ले कार्तिक स्वामींच मंदिर नाही तर कालभैरवाच मंदिर प्रसिध्द आहे. आणि ती दोन्ही मंदिर एकमेकाकड तोंड करून आणि लागूनच आहेत. पण सरांनी आम्हाला कार्तिक स्वामींच मंदिर का सांगितल ते पुठ गेल्यावर कळाल. कारण त्या मंदिरांकड जाताना दोन पुरातन आशी मंदिर आहेत. त्यातल एक मंदिर थोड जास्त पडलय नी दुसरं थोड व्यवस्थित आहे, ते सोमेश्वराच मंदिर. दोन्ही मंदिर महादेवीचीच कारण दोन्हीत पिंडी होत्या. पण जस सोमेश्वर हे महादेवाचाच अवतारी रूपाच तसच ते दुसर मंदिर कोणत्या रूपाच होत का महादेवाचच होत हे मला वाही कळल. पण ती मंदिर पाहूण खुपच आल्हाददायक वाटल. पहिल्या मंदिरात गेलो बहुतेक तिथ गाळ साचलेला तो नुकताच काढला होता. तो गाळ पावसाळ्यात जमला आसनार कारण सोमेश्वर मंदिरापेक्षा या मंदिराचा चौथरा न्हवता ती जमीनीसमान होत आणि त्या मंदिरांपुठ पुर्वी बहुतेक लहानस तळ आसल पाहीजे जे आत्ता बुझलय कारण आजपण तिथ दलदलवजा जमीन आहे आणि तिथून एकसारख पाणी ही येत होत जे गटारीवाटे पुठ आम्ही ज्या ग्रहस्ताला मंदिराबद्दल विचारल तिथल्या ओठ्यात जावून मिळत होत. मंदिरात गेलो आत थोड भयान वाटल. एखाद्या तमिल पिक्चरमध्ये जुनी मंदिर दावतात ना तसच. त्यात फाकूळ्यांची (bats) भर. आत गाभार्यात जाण्याचा प्रयत्न केला तर सरळ त्या तोंडावच आल्या. आम्ही लगेच बाहेर आलो. आणि सोमेश्वराच्या मंदिरात जाण्यासाठी म्हणून परत फिरून जाव लागल त्या दलदलीमुळ. पण त्याच मंदिरापुढ गटारीच्या जवळच विष्णूची जवळ जवळ 5/1.5 फुटाची पाशाणाची मुर्ती होती. ज्यात विष्णू आपल्या आसनावर झोपलेला. पण त्याच्या बिंबीतून ब्रम्ह आलाय आस जे प्रत्येक फोटोत मी पाहीलय किंवा आम्ही संगमेश्वरला गेल्यानंतर तिथ कर्णेश्वराच्या मंदिरात जशी ती मुर्ती होती तस ह्या मुर्तीत न्हवत. पण आश्चर्याचा धक्का बसला की विष्णूची मुर्ती अशी गवतात एका कोपऱ्यात पडूनच होती. मग आम्ही सोमेश्वराच्या मंदिरात गेलो. तिथ बहुतेक रोज पुजा होत होती. कारण शेजारीच एका गुरवाच घर आहे तिथ. तिथ बाहेर त्या गुरवाच्या नावाची पाटी पण लावलीय. सोमेश्वर मंदिरात थोड प्रसन्न वाटल. तिथल्या त्या खांबांच कोरीव काम आणि आणि बाकी शेवाळे वरचेवर जी माहीती देत होता ते ऐकून खुप मस्त वाटालत. पण वेळ होईल म्हणून शेवाळे सारख माग लागल्याल 'चला, चला' म्हणून. मग निघता निघत नसलेला पाय तिथून काठला. शेवाळेच्या मतानुसार ती 'सातवाहन' काळातील मंदिर असावीत. पण त्या काकांनी सागितल तस ते कालभैरवाच मंदिरपण पाहून जाव आस मला वाटात होत नी सरांनी सांगितलेल ते कार्तिक स्वामांच मंदिर मग विचारपुस करून तिथूनच काही अंतरावर आसनार ते मंदिर पाहायला गेलो. काही खास आस न्हवतच. कालभैरवाच मोठ मंदिर आणि पुढ लहानस स्वामींच मंदिर. मला तर खात्रीच पटली की सरांना आम्हाला स्वामींच मंदिर दावायच न्हवत तर ती दोन जूनी मंदिर दावायची होती. मग काय कालभैरवाचा नी स्वामींचा आशीर्वाद घेतला नी निघालो. तिथ खास आस काय होत तर फक्त ते न्यानवापी काशीकुंड. मग आम्ही परत महाराजांच्या स्मारका जवळ आलो आणि डाव्या हाताच्या रोडन आत गेलो. आत गेल्यानंतर परत विचाराव लागल मग विचारत विचारत सरदेसाईंच्या त्या वाड्यावर पोहोचलोच, जिथून महाराजांना पकडल गेल. वाड्याची खुपच दुर्रावस्था झालेलीय. फक्त बाहेरणच पाहता येतो. आम्ही खिडकीतून आत पाहण्याचा प्रयत्न केलापण काही पाहता आल नाही. पण आतही खुपच भकास आसनार याची जानिव झाली. आपल्या पुरातण खात्यान चांगलच दुरलक्ष केलय. एका महान राजाचा राहता वाडा, त्याची ती एवढी ख्याती, काही काही शिल्लक राहील नाही तिथ. मला तर कधी कधी लाज वाटते माझ्या देशातल्या ह्या सगळ्या अधिकार्यांची जे फक्त आपण आणि आपल्या कुटूंबाच्या पुढच्या पिढ्या बसून सूखान कस खातील याच तंदरीत आसतात. विचारही करवत नाही का यांना की आपली ही सम्रूद्धशी संस्क्रुती आणि ह्या ऐतिहासिक वास्तू आपण नाय जपल्या तर आपल्याच नव्या पिढ्या यात कसा रस घेतील. मला खरच बाहेरच्या त्या देशांचा अभिमान वाटतो ज्यांनी आपली संस्क्रुती नी वास्तू अश्या काही जपून ठेवल्यात की आजही त्या नव्याच वाचतात. त्यात इंग्लंडही आहे. जरी त्यानी एके काळी आपल्याच देशाला लुटून ते सगळ केल आसल तरी. पण आपल्या देशातील राज्यकर्ते फक्त घोषणा करायच्या नी त्या आडथळे आलेत म्हणत त्या पुढल्या निवडणूकी पर्यंत खेचत न्यायच्या नी परत त्याच घोषणाची पुर्तता करण्याच्या बहाण्याने त्यांचे उद्घाटन कार्यक्रम ठेवून परत जनतेला आपल्याकड वळवून घ्यायच. महाराजांच इतक मोठ स्मारक बनवतात पण त्याच महाराजांनी ज्यांच्या बळावर हे स्वराज्य उभारल त्याच किल्ल्यांकड दुर्लक्ष केल. फक्त घोषणा करून, माणस नेमून काही फरक पडत नसतो. यातून मला कोणालाही सपोर्ट किंवा कोणाला विरोध करायता नाही फक्त एक शिवप्रेमी नी इतिहासप्रेमी म्हणून माझ मत मांडतोय.
मग तिथूनच पुढ ती शेवाळेच्या मित्रांनी पाहीलेली ती प्राचीन मंदिर होती. तिथ तिन मंदिर होती त्यातली दोन महादेवाची नी एक बहुतेक सुर्यमंदिर होत. त्यांवर खुप विशिष्ट पद्धतीची कोरीव कामे केली होती. त्यातील एका मंदिरावर कामशास्त्राबद्दल कोरीव काम केल होत. आणखीही खुप काही होत त्यावरती. खुपच मनोभावे मी ते पाहत होतो शेवाळे सगळ पाहून बसला तरी मी आजून एकच मंदिर पाहत होतो. खुप मस्त वाटत होत. मला आठवतय मी दहावीत आसताना हंप्पी बदामीच्या सहलीला गेलतो. तश्याच प्रकारची ही मंदिर होती. फक्त फरक इतकाच की तिथ त्यांची नीगा राखली जाते आणि हित यांकडे कोण ठुमकून ही पाहत नाही. कधी कधी वाटत आपल्या महाराष्ट्रातल ही संस्क्रुतीची जोपासना आपण तरूनांनी मिळूनच केली पाहीजे. त्यात पहील पाऊल म्हणून मी माझ्या काही मित्रांसमवेत मिळून 'छत्रपती शिवाजीराजे फौंडेशन' नामक संस्थाही काढलीय.
मंदिर पाहिली, मनात खुप काही येवून गेल आणि वाईटही वाटल की आपण फक्त विचार करण्यापलीकड काहीच करू शकत नाही. आता आम्हाला कर्णेश्वराच मंदिर आणि त्या तिन नद्यांचा संगम पाहायचा होता. पण त्याआधी, भुका काही लागल्या न्हवत्या, सकाळी घरातून निघताना खाल्लेला शिरा नी खाल्लेला वडापाव व काँफी आणि त्या शाळेत गेल्यानंतर घेतलेला चहा यावरच होतो तरीही भुका न्हवत्या लागल्या, आणि हो ती बंबई मिठाई तिही. पण थोड गार व्हाव म्हंटल तिथच एक आईस्क्रिम पार्लर होत. खुप विचार करून आंबा मिल्कशेक आँर्डर केल. शेवाळे म्हणालत 'चांगल आसतय का ते', मी बोल्लो 'भारी आसतय', आतली गोष्ट म्हणजे मी ही पहिल्यांदाच खाणार होतो मिल्क शेक. मस्त होत. आंबा खाल्यावानी वाटल. गार आंबा. पोट जरा गार पडल. मग नव्यान हुशारकी आली. कर्णेशवर मंदिर नी तो संगम नेमका कुठाय माहीत न्हवत. एक सहल आली होती कुठून तरी त्यातली मुल त्या उन्हात गार होण्यासाठी म्हणून आत येत होती. तिथल काका एकावर वैतागलच. एकदमच सगळी मुल आत आली आणि त्यांचा दंगा सुरू झाला, 'काका ह्य द्या, काका ते द्या'. त्यामुळे आम्हाला कळाल की ते याच बाजूलायत. मग त्या काकांनाच विचारल नी गेलो पहिल्यांदा संगमावर गेलो. इतका काही खास नाही वाटला, बहुतेक जास्त पाणी नसल्यामुळे. पण तिथ तश्याच कलाकुसरीच आणखीन एक प्राचीन मंदिर होत. महादेवाचच. त्यात गणेशाचीही मुर्ती होती. खुप सुबक होती. मग संगमात थोड हात पाय धुतल नी सरळ कर्णेश्वर मंदिरात. हे ही महादेवाचच मंदिर. पण खुप मोठ होत. विशाल घेरा होता या मंदिराचा. खुपच मस्त वाटल. आत गेल्यानंतर एकदमच थंड वाटल. पायांना गारवा लागला. गाभार्यात जाताच तिथला पुजारी सरळ आमच्या पुठ्यात येवून काही श्लोक म्हणू लागला. महादेवाला आम्ही कुठून आलोय हे सांगून आमच्या सगळ्या इच्छा पुर्ण करण्यास सांगितल्या. मग शेवटी माझ्या मनात आलत त्या प्रमाण त्यांनी मनात येईल तेवढी दक्षिणा ठेवायला सांगितली. शेवाळे कडे सुट्टे पैसे न्हवते आणि माझ्याकडे फक्त तिनच रूपये होते. मी तेवढेच ठेवले. मग काय शंभरची नोट थोडीच ठेवू शकत होतो किंवा त्यांना त्यातल आकरा रूपय घेवून बाकीचे परत द्या आस बोलनार होतो! मी किंवा शेवाळे दोघही आजून घरातल्यांवरच विसंबून होतो. कमवायल्याव बघू. त्यांनी आम्हाला आसपासची आणि श्रूंगारपुरची माहीती दिली. जिथ छत्रपती संभाजी महाराज वास्तव करायचे तेच ते ठिकाण. आणि मग आम्ही आशीर्वाद घेतले आणि परत निघालो. पुजारींनी माहीती सांगता सांगता मी ठेवलेल्या दक्षिणेवर एक कटाक्ष टाकला. मला वाटतय तो पुजारी मनातल्या मनात बोल्ला आसेल 'येवढ्या लांब कोल्हापुरवरून येवून इतक भिरकायत पण देवाला दक्षिणा किती दिली!', मी ही मनातल्या मनातच बोल्लो 'देवाला दक्षिणेपेक्षा श्रद्धा महत्वाची असते, जी माझ्यात आहे'. मग बाहेर पडलो. शेवाळेला श्रुंगारपुरला जावूया आस सुचवल्यावर त्याने उशीर होईल आस मला सुचवल. फक्त 20-25 किमीच अंतर होत पण वेळच न्हवता. असो परत कधीतर. मग आता सरळ आम्ही साखरप्याला यायला निघालो. येताना आमच्या दोघांच्या जम्बलींग मुळ आम्ही कोकणचा रस्ता धरला जो रत्नागिरीत पोहचत होता. शेवाळेण कोणा मित्राला फोन केलता. त्याच्याकडे जायच होत. मी म्हणालोही शेवाळेला की आपण दुसर्या रस्त्यावर आलोय पण शेवाळे त्याच्याच तंदरीत हुत. 2-3 किमी पुढ गेल्यानंतर याला कळाल की आपण चुकलोय. मी त्या विचारल्याव बोल्ला की आपण आलतो त्याच रस्त्यान जायचय. रस्त्यातच भेटायचय त्या कोणा मित्राला. मग तिथ उभे आसलेल्या दोन मित्रांना विचारल तर ते बोल्ले हा रस्ता कोल्हपुरला नाही तर रत्नागिरीला जातो. मग परत माग फिरलो आणि संगमेश्वर मधल्या त्या चौकातून आपल्या कोल्हापुरला येणारा रस्ता पकडला. निवांत गाणी म्हणत आमता प्रवास सुरू होता. कुसूममध्ये आल्यानंतर ज्या मित्र रूपी इसमाला भेटायच होत त्याच घर विचारल तर तो व्यक्ति तिथ प्रसिद्ध आसल्याच आम्हाला कळाल. त्या व्यक्तिच्या घराबाहेर आलो, पण ते इसम फोन उचलत न्हवते. गेतमधून आत गेलो आणि तिथल्या शेजारी आसलेल्या व्यक्तिला विचारून आम्ही दाराबाहेर जावून उभारलो. बेल वाजवली पण आतून कोणच येईना पण थोड्यात वेळात घरा मागून एक इसम आले, ते हेच होते. आस त्या दोघांच्या संभाषणातून मला जाणवल. कारण त्या इसमाच्या अंगावर एकदमच बाद कपडे होते. मला नंतर कळाल की ते मागच्या बागेत पाणी पाजालते. शेवाळेच्या ओळखीच्या ओळकीतले ते इसम तिथले कोणीतरी पुढारी वाटले, भल मोठ्ठ घर, त्यात आम्ही ज्या हाँलमध्ये बसलेलो तिथे एक सोफा आणि पुर्ण हाँलच्या चारी भिंतींना लागून खुर्च्या होत्या तिथ. परत ते नक्की झाल. ते आमच्यासाठी चहा बनवून आनण्यासाठी म्हणून आत गेले. चहा ठेवून ते परत आले आणि मग शेवाळेच्यात आणि त्यांच्यात बोलन सुरू झाल. मी फक्त ऐकत बसलेलो. ते त्यांच्या त्यांच्या घराण्यांन बद्दल बोलालते. त्यातून मला इतक कळाल की हे हितले आणि शेवाळे आमच्या भागातल्या जाधव घराण्यांचे वारसदार आहेत. मग त्यांच चाललेल आसच त्या संबंधीच बोलन. मी फक्त ऐकत बसलेलो. मला पहिल्यांदा त्यावेळी शेवाळेचा अभ्यास आणि त्याच न्यान यांची प्रचीती झाली. आणि त्यावेळी मी मनातल्या मनात एका नावाचा शोध लावला तो म्हणजे 'शिवप्रसाद जाधव'. आसो, तेंच ते सगळ बोलन सुरू आसतानाच चहाच लक्षात आल्यावर ते उठले, हाँलच्या उंबऱ्यापर्यंत सहज चालत गेले आणि बहुतेक चहा उसळला म्हणून तिथन लगबगीन आत पळाले. ते चहा घेवून आले, आमच्या पुठ्यात ठेवला आणि बाहेर कुठेतर गेले, मला चहाची चांगलीच तल्लब आलती मी एक कप उचल्ला, बिस्केट पण होती एक घेतल आणि शेवाळेला पण चहा घेण्याचा इशारा केला, ते म्हणाल 'ते आल्यावर घेतो', मी बोल्लो 'आसुद घे' तरीपण नायच घेतल. मग मी ही तसाच कप घेवून थांबलो आणि बिस्केट परत प्लेटमध्ये ठेवल, नी त्यांची वाट पाहू लागलो, शेवाळे राव लयच मँनर्स पाळाय बघतय (आणि कुठपण). ते आले आणि बोल्ले 'घ्याना चहा घ्या की, लाजू नका', आणि त्यांना शेवाळेच उत्तर 'नाही, आपल्याच घरात काय लाजायचय', मग मी काय त्याला कन्नडमध्ये सांगितलेल होय. काय राव कदरच नाय! बर मग काय परत तेंच तेच सुरू झाल मी जरा समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. तरीपण मी पुर्ण सायलेंट होतो, कारण जास्त काय कळत न्हवत. ते काय म्हणतील तेला फक्त होकारार्थी मान हालवायची. मग खुप साऱ्या गप्पा झाल्यानंतर बहुतेक दोघांच समाधान झाल आसल, शेवाळेला आठवन झाली की आम्हाला उशीर होईल. मग त्यांचा निरोप घेवून आम्ही निघालो. आता सरळ साखरप्पा गाठला तिथ वाकसे सरांना फोन लावून त्यांच घर गाठल. 'कमानी तून सरळ आत या आणि हिरवा ड्रेस घातलेला माणूस दिसत नाय तोवर थांबू नका' हि सरांची इन्स्ट्रक्शन पाळत आम्ही सरांच्या घरी पण पोहचलो. 'पण सरांनी निळा ड्रेस घातलेला'. बर आसुदे आस मी मनालाच म्हणालो. सरांच्यात पोहचलो. फ्रेश झालो मग आमच आजच पुराण सरांना सांगितल. खरच आसेच पाहीजेत शिक्षक. प्रेमळ, सोज्वळ, सगळ्यांना आपल करणारे. मला आवडले सर. मला वाटल मी त्यांना खुप आधी पासून ओळखतोय. मग पोहे आले. मस्त होते, मला आमच्या मम्मीच्या हातचे पोहे आठवले, तिलातर स्वयंपाकात तोडच नाही. माझा स्वभाव लाजरा नसताना मी परत मागून घेतले आसते, कारण एक तर सकाळपासून जेवलो न्हवतो आणि पोहोपण मस्त होते. मग काय तेवढच खाल्ल आणि चहा प्यालो. चहा झाला गप्पा झाल्या, शेवाळे नी सर कोणा चव्हाण सरांन बद्दल बोलालते, की ती खुप अभ्यासू आसूनपण त्यांच्या आत्मविश्वासामुळे ते कसे मागे राहीले. निघताना सरांनी मला नी शेवाळेला एक एक पुस्तक दिल. माझ चिलेंच गडांवरील पुस्तक. मला आवडल. आम्ही निघालो. निघता निघता तिथलेच सरांच्या ओळखीेचे कोणतर तिथलेच शिक्षक होते, त्याच्याशी ओळख करून दिली. ते आमच्याच भागातले होते. मग त्यांचा निरोप घेतला आणि निघालो. 7 वाजले आसतील. आंधारामुळे माझ्या एक लक्षात आल की आमच्या गाडीचा लाईट खुपच डिम झालाय. लाईटच पडत न्हवता. दैव बलबत्तर की पुढून येणाऱ्या गाड्यांना दिसल येवढी लाईट होती. पण आम्हाला पुढच काहीच दिसत न्हवत.
@insta - https://www.instagram.com/p/CA1z-skJIMp/?igshid=14q4k7ins1ogh

मग काय तसच निघालो. खरतर पुढच कायच दिसत न्हवत. शिवाळेला थ्रिल वाटालता. मलाही. गाडी रोडवरून खाली उतराय नको आणि रस्ता दिसत न्हवता, त्यात वळणावळणांचा रस्ता, म्हणून मी गाडी गाडीला लागून दिसनाऱ्या सौरक्षक पट्याला लागून गाडी चालवू लागलो. उशिर झालेला म्हणून थोड फास्ट येत होतो. मागून कोणती गाडी, ट्रक आला तर त्यांच्या लाईटच्या उजेडात थोड फास्ट पळवायचो त्यांच्या पुठच राहायचा प्रयत्न करत. ईसच येत होतो. थोडी थंडपण वाजालती. पण खरतर खुपच थ्रिलींग आणि मजा वाटालती. घाट संपायला 7-8 किमी बाकी आसतील, आमच्या मागबन एक 'फेजर' गाडी घेवून आला. त्याच्यापण पुढच मारालतो गाडी. परत एका ट्रकमुळ तो पुढ आला. मग त्याच्या पुढचाच रस्ता बघायचो नी गाडी चालवायचो. माझ लक्ष फक्त लाईटच्या प्रकाशात आसलेल्या रोडवर होत. परत काही वेळात मी त्यांना माग टाकल, त्यानंतर पुर्ण घाट संप्पे पर्यंत ते माझ्या मागेच होते, मलातर वाटल ते आम्हाला वाट दावायलाच मागे थांबलेत. मी त्यांना मागच ठेवल, घाटातपण. मग थोडी चिंता मिटली. पण घाटात पुढून येणाऱ्या गाड्यांची लाईट वळणांमुळे तोंडावर पडत नाही, पण घाट संपल्यानंतर लाईट सरळ तोंडावर त्यामुळ पुढच काय दिसायचच नाय. तरीही रेटत होतो. आम्ही बोरीवडे फाडियवर पोहोचलो. तिथ थांबून भेळ खाल्ली. आणि थोड पुढ येवून चहा घेतला. खरतर आता जानीव होत होती की खरच टू-व्हिलरन आस फिरण कोणालाही नाही जमत, कारण आम्ही भेळ खाल्ली तिथले लोक नावजालते आम्हाला, परत माझे मित्र व घरचे पण आपरूप व्याक्त करतात. चहा पित-पित माझा मित्र आंबवडेतल्या राजदिप सुर्वेला फोन केला आणि त्याला आंबवडेरोडवर बोलवून घेतला. आम्ही पोहोचलो तिथं, सुर्वे आल न्हवत. कडू, 10-15 मिनटात आल. त्याला शेवाळेला घरला सोडीय लावल. आणि दोघांचा निरोप घेवून मी घरी आलो. 10 वाजलेले बहुतेक. मग काय जेवलो नी झोपलो.
मस्त वाटल, खरतर माझ्या मनतल्या प्रवासावर आज मी गेलतो. कोकणात गेल की आपोआपच मला ग्रेट फिल होत, त्यात किल्ले म्हंटल तर माझ्या मनाचा विषय, एक वेगळच नात आहे माझ किल्ल्यांशी, मलातर वाटत मी मागच्या जन्मी बहुतेक मावळाच आसेन. आसो, nss मध्ये गेल्यापासून फिरायला वगैरे सुरवात तर केलतीच पण आज खरच माझ्या स्वप्नातल्या प्रवासाला मी सुरवात केली. मी आणि माझ्या 'मनातला शनिवार'.....

Comments